(फाईल फोटो- लालू प्रसाद यादव आणि मुलायमसिंह यादव (उजवीकडे))
लखनौ (उत्तर प्रदेश)- समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची मैत्री आता नात्यात रुपांतरीत होणार आहे. लालूंची मुलगी राजलक्ष्मी हिचे लग्न मुलायमसिंह यांचा चुलत नातू तेज प्रताप यांच्यासोबत पक्के झाले आहे. तेज प्रताप मैनपुरी येथून खासदार निवडून गेले आहेत. यापूर्वी मुलायमसिंह येथून खासदार होते.
लालू प्रसाद यादव आणि मुलायमसिंह यांच्या उपस्थितीत सोमवारी दोन्ही कुटुंबे दिल्लीत भेटणार असल्याचे सूत्रांकडून समजते. यावेळी तेज प्रताप आणि राजलक्ष्मी यांच्या साखरपुड्याची तारीख निश्चित केली जाईल. त्यांचा साखरपुडा डिसेंबरमध्ये तर लग्न फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे.
लालू प्रसाद यादव आणि मुलायमसिंह एकत्र आले तर 1990 च्या दशकात दोघांमधील वाद कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. 1997 मध्ये संयुक्त आघाडीचे सरकार स्थापन करण्यात येत असताना मुलायमसिंह यांची निवड पंतप्रधानपदी होणार होती. पण यावेळी लालू प्रसाद यादव यांनी अडकाठी आणली होती, हे मुलायमसिंह जाहीरपणे बोलून दाखवतात. दरम्यान, आता दोघांमधील मैत्री बरीच बदललेली आहे. दोघांमधील नव्या नात्याने नवीन अध्याय लिहिला जाण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, तेज प्रताप यांच्याबाबत....