आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mulayam Singh Grandson Marriage With Lalu Prasad Yadav Daughter In UP

PHOTOS: लालू-मुलायम कुटुंबातील लग्न, सैफईला मोदी-अमिताभ यांच्यासह VVIP पाहुणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ/सैफई- समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांचा नातू तेजप्रताप यादव यांच्या लग्न समारंभातील तिलक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजकारणातील अनेक दिग्गज सैफईला आले आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्या मुलीसोबत मुलायमसिंह यादव यांच्या नातवाचे लग्न होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत बॉलिवूडमधील अनेक स्टार्स आले आहेत. दरम्यान, मोदींच्या सुरक्षेमुळे विमान लॅंड करायची परवानगी न मिळाल्याने अमिताभ यांचे विमान लखनौला उतरवण्यात आले. तेथून ते हेलिकॉफ्टरने सैफईला आले.
लालू प्रसाद यादव, जनता दल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव, मध्ये प्रदेशचे गृहमंत्री बाबू लाल गौर शुक्रवारीच सैफईत दाखल झाले. लग्नाच्या तिलक समारंभाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, अभिनेता सलमान खान, उद्योगपती अनिल अंबानी, पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी, राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह, नेते अमरसिंह आदी उपस्थित राहणार आहेत.
काल रात्री पाहुण्यांसाठी म्युझिकल नाईटचे आयोजन करण्यात आले होते. गायक अदनान सामीने यावेळी सुरेल गीत सादर केले.
या सोहळ्यातील ठळक आकर्षण
-500 स्वीस कॉटेज मांडव एका स्टेडियममध्ये लावण्यात आले आहेत. 250 सामान्य मांडव चौधरी चरण सिंह पीजी कॉलेजच्या प्रांगणात लावण्यात आले आहेत. इटावा जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स बुक करण्यात आले आहेत. मैनपुरी, आग्रा, फिरोजाबाद येथील हॉटेल्समध्ये पाहुण्यांच्या थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

-खास पाहुण्यांसाठी स्वीस कॉटेज मांडवांची व्यवस्था करण्यात आली आहे. इतर सामान्य लोकांसाठी सामान्य मांडव चौधरी चरण सिंह पीजी कॉलेज मैदानावर टाकण्यात आले आहेत. मुलायमसिंह आणि त्यांचे बंधू शिवपाल यादव या कॉलेजचे ट्रस्टी आहेत. या कॉलेजमध्ये सुटी जाहीर करण्यात आली आहे.

-स्वीस कॉटेज मांडवातील पाहुण्यांना तेथेच जेवण वाढण्यात येणार आहे. महिलांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. स्वीस कॉटेल मांडवाला आग लागली तरी ती भडकत नाही. लगेच कापडाची राख होते असे सांगितले जाते.

-पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी तीन हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. 12 आयपीएस अधिकारी सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहेत. शिवाय पाच सुपर अॅम्ब्युलंस आणि 500 सरकारी वाहने ठेवण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यसचिव अलोक रंजन आणि डीजीपी ए. के. जैन गेल्या आठवड्यापासून लग्नसमारंभाच्या कामात आहेत.

-भोजन तयार करण्यासाठी दिल्ली आणि मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमधून शेफ बोलवण्यात आले आहेत. यावेळी बिहारमधील प्रसिद्ध मसलन-बाची चोखा आणि लिट्टी वाढली जाणार आहे. मोदींसाठी खास गुजराती व्यंजन तयार करण्यात आले आहेत. जेवणात 100 पेक्षा जास्त व्यंजनांचा समावेश राहणार आहे.
पुढील स्लाईडवर बघा, तिलक सोहळ्याच्या तयारीचे फोटो... आलेले व्हीव्हीआयपी पाहुणे....आणि नरेंद्र मोदी यांचा शुट करण्यात आलेला व्हिडिओ...