आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muzaffarnagar Riots News In Marathi, UP, Muslim Leaders,

मुजफ्फरनगर दंगल, 'एसआयटी'ने 10 मुस्लिम नेत्यांविरुद्ध दाखल केले आरोपपत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फरनगर- बहुजन समाज पक्षाचे खासदार कादिर राणा, याच पक्षाचे दोन आमदार आणि उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि कॉंग्रेस नेते सईद ऊझ झामा यांच्यासह 10 मुस्लिम नेत्यांविरुद्ध दंगल भडकविल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मुस्लिम समाज पंचायतीला संबोधित करताना द्वेषपूर्ण भाषण केल्याचा विशेष चौकशी समितीने (एसआयटी) त्यांच्यावर आरोप ठेवला आहे.
मुख्य न्यायदंडाधिकारी नरेंद्रकुमार यांच्या न्यायालयात मुजफ्फनगर दंगलीची चौकशी करणाऱ्या एसआयटीने आरोपपत्र दाखल केले आहे. भडकलेल्या दंगलींमुळे कावल गावात प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले होते. तरीही येथील खालापार परिसरात 30 ऑगस्ट 2013 रोजी उभय नेत्यांनी द्वेषपूर्ण भाषण केले. त्यानंतर आणखी दंगली भडकल्या होत्या. त्यामुळे या नेत्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, मुजफ्फरनगर दंगलप्रकरणी मुस्लिम नेत्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाने कायदा मंत्रालयाकडे तगादा लावला होता. परंतु, एसआयटीने दाखल केलेल्या आरोपपत्रात नावे आल्याने मुस्लिम नेत्यांना वाचविणे समाजवादी पक्षाला शक्य होणार नसल्याचे दिसून येते.