आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nd Tiwari Live In With Ujjwala Sharma Lucknow News

एनडी तिवारी व उज्ज्वला यांच्या \'लिव्ह इन\' संसाराला सुरुवात... पहा फोटो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - शुक्रवारच्या नाट्यानंतर उज्ज्वला शर्मा या एनडी तिवारी यांच्याबरोबर 'लिव्ह इन'मध्ये राहू लागल्या आहेत. त्यामुळे तिवारी यांच्या दैनंदिन कार्यक्रमांमध्येही बराच बदल झाला आहे. आता ते संपूर्ण कुटुंबासोबत राहत आहेत. उज्ज्वला यांनी पहिल्या दिवसापासूनच त्यांची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. त्या तिवारी यांना डॉक्टरांच्या स्ल्ल्यानुसार वेळेवर आणि योग्य आहार देत आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्या तिवारी यांची संपूर्ण काळजी घेत आहेत.

divyamarathi.com च्या टीमने स्वतः भेट देऊन एनडी तिवारी यांच्याबाबत माहिती घेतली. त्यांच्या तथाकथित पत्नी उज्ज्वला शर्मा यांनी तिवारीच्या संपूर्ण दिवसाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. उज्ज्वला यांच्या येण्यामुळे घरात नवी ऊर्जा संचारली असल्याचे तिवारी यांनीही मान्य केले.

शुक्रवारी सुमारे साडेतीन वाजेच्या सुमारास तिवारींच्या घरी आल्याचे उज्ज्वला यांनी सांगितले. तिवारी यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार दिला जात असल्याचे, उज्ज्वला यांनी सांगितले. त्यासाठी आम्ही काही बदल केले असून तिवारी यांनाही ते बदल आवडले असल्याचे उज्ज्वला म्हणाल्या.

त्यांनी सायंकाळी तिवारी यांना चहा दिला. तो त्यांना भलताच भावला. सायंकाळी तिवारी यांना चहा घेताना टीव्ही पहायला आवडतो. त्यामुळे उज्ज्वलाही त्यांच्याबरोबर टीव्ही पाहणे पसंत करतात. त्यानंतर तिवारी यांनी काही लोकांची भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर चर्चा केली. त्यानंतर ते विश्रांती करण्यासाठी गेले.

रात्री सुमारे ८ वाजता तिवारी यांनी जेवण केले. त्यांना बटाटे आणि तुरीच्या डाळीचे वरण आवडते. पण डॉक्टरांनी आहारात बटाट्याचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला दिल्याने त्यांनी काही हिरव्या भाज्या देण्यात आल्या होत्या.

डॉक्टरांनी तिवारी यांच्या खाण्यावर अनेक बंधने घातली आहेत. त्यामुळे त्यांना सतत एकच एक पदार्थ खाण्याचा कंटाळा आला आहे. त्यामुळे त्यांना चालणारे पदार्थच पण वेगळ्या स्वरुपात तयार करु त्यांना देत असल्याचे उज्ज्वला यांनी सांगितले.
पुढे पहा... तिवारी आणि उज्ज्वला यांच्या नव्या संसाराची काही छायाचित्रे...