आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लालूंना कोणीही गांभीर्याने घेत नाही, अगदी नितीशही’, अटलबिहारींच्या आरोग्याची चौकशी करण्याची मागणी फेटाळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालिया (उ.प्र.) - लालूप्रसाद यादव यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे देखील त्यांचे म्हणणे फारसे गांभीर्याने घेत नाहीत, असे केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह म्हणाले. त्यांनी राजद नेता लालूंची  राजकीय क्षेत्रातील प्रतिमा काय झाली आहे याविषयी शालजोडीतले मारले. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन म्हणाले की, लालू विरोधी पक्षनेता आहेत.
 
एनडीएला विरोध करणे एवढेच त्यांचे काम आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या आरोग्याची चौकशी करावी, अशी मागणी लालूंनी केली होती. ती फेटाळण्यात आली आहे.  
मंगळवारी रायबरेली येथे बोलताना लालूप्रसाद यादव यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या आरोग्याची चौकशी होण्याची गरज असल्याचे म्हटले होते. त्यांना जाणीवपूर्वक ग्लानीच्या आैषधांवर ठेवण्यात येत आहे. राजकारणातून त्यांना डावलण्याचा हा डाव असल्याची टीका लालूंनी केली होती. 
 
यावर पत्र परिषदेत राधामोहन यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी राजद नेता लालूंवर टीका केली.  राधामोहन सिंह हे बिहारचे लोकप्रतिनिधी असून त्यांना मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजप दरम्यान मैत्री आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. कुमार यांचे भविष्यातील धोरण काय असेल याचा केवळ अंदाज बांधता येतो. त्यावर निश्चितपणे काही सांगण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. 
 
उत्तर प्रदेश सरकारवर टीका-  
केंद्रीय कृषी मंत्रालयाने उत्तर प्रदेश सरकारला कृषी विज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी १० पत्र पाठवले. मात्र त्याची दखल घेण्याची गरज अखिलेश यादवांना वाटली नाही. राज्यात २१ नवी केंद्रे उभारण्याची केंद्राची योजना आहे. मात्र सरकारची भूमिका सकारात्मक नसल्याची टीका केली.
 
लालूप्रसादांचा तर्क हास्यास्पद : उमा भारती   
केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी वाजपेयींच्या आरोग्याविषयीचे लालूप्रसाद यादवांचे वक्तव्य हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. लखनऊ येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत त्यांनी लालूंना सल्ला दिला की त्यांनी वाजपेयींच्या कुटुंबीयांची भेट घ्यावी. त्यामुळे त्यांना वास्तविकता समजू शकेल, असे उमा म्हणाल्या.
बातम्या आणखी आहेत...