आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेगाडी रोखली, सेल्फी काढून फरार; उत्तर प्रदेशात तरुणाचा उपद्व्याप,पाठलाग अयशस्वी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- सेल्फी घेण्याचे वेड किती भयंकर असू शकते, याचा प्रत्यय नुकताच उत्तर प्रदेशात आला. एका तरुणाने व्हीआयपी राजधानी एक्स्प्रेसला रोखले. गाडी थांबताच त्याने सेल्फी घेतला आणि तो लगेच पसार झाला. चालकाने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो त्याच्या हाती लागला नाही.  
 
ही घटना उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील आहे. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास दिल्ली-सियालदाह राजधानी एक्स्प्रेस पोरा स्थानकापर्यंत पोहोचली होती. या दरम्यान मार्गावर चालकाला एक लाल झेंडा घेऊन उभा असलेला तरुण दिसला. रूळ दुभंगलेला असावा, अशी शंका पहिल्यांदा चालकाच्या मनात आली. त्यामुळे त्याने इमर्जन्सी ब्रेक लावला. परंतु लाल निशाण दाखवणारा तरुण सेल्फी घेत असल्याचे पाहून चालक अचंबित झाला. त्यावर चालकाच्या सर्व प्रकार लक्षात आल्याने त्याने तरुणास पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. चालकाने नियंत्रण कक्षाला हकिगत सांगितली. रुळाचे परीक्षण करून गाडी पुढे रवाना झाली. परंतु प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. 
 
३५ मिनिटे विलंब
अगोदरच अनेक भागात रेल्वेला विलंब होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तरुणाच्या उपद्व्यापामुळे शताब्दी  ३५ मिनिटे विलंबाने पोहोचली. गाडीचा मार्ग तपासण्यात आल्यानंतरच गाड्यांना रवाना करण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे इतर ९ गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला. त्यांना वेगवेगळ्या स्थानकांवर अधिक वेळ थांबावे लागले होते.  

संपर्क क्रांतीच्या चालकांत भांडण,  पुढे नेण्यास नकार, दोघे निलंबित  
अन्य एका घटनेत संपर्क क्रांतीचा चालक व सहायक चालक यांच्यातील भांडणाचा फटका प्रवाशांना बसला. त्यात गाडीला दीड तास विलंब झाला. प्रवासादरम्यान दोन्ही चालकांत काही कारणावरून बाचाबाची झाली. त्यानंतर भांडण वाढले. गाडी कानपूरजवळील झिंझक स्थानकावर असताना दोघेही खाली उतरले. त्यांनी गाडी पुढे नेण्यास नकार दिला. त्यामुळे प्रशासनाला दोन चालक पाठवावे लागले. अखेर दीड तासानंतर गाडीला रवाना करण्यात आले. दोन्ही चालकांना निलंबित करण्यात आले. चालकांच्या भांडणामुळे २४ हून अधिक गाड्यांवर त्याचा परिणाम दिसून आला. चालकांतील भांडण सोडवण्याचाही प्रयत्न झाला होता. 
बातम्या आणखी आहेत...