आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उ.प्र मध्ये सुरक्षित जागांवर त्रिकोणी सामना, भाजप 27 वर्षांत 53 वरून तीनवर, तर बसप शून्यावरून 62 वर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशात मुस्लिम मतदारांनंतर सर्वाधिक दलित मतदार आहेत. तसे तर या वर्गाच्या प्रत्येक जागेला महत्त्व आहे, पण राज्यात ४०३ मधून ८७ जागा सुरक्षित घोषित आहेत. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत त्याच पक्षाचे सरकार बनते, जो या जागांवर बहुमत मिळवतो. २७ वर्षांपासून पक्ष डाव टाकताहेत. विशेष अजेंडे ठरवून दलित कार्ड खेळताहेत. या वेळीही पक्षांनी कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. 
 
दोन दशकांत राज्यातील या सुरक्षित जागांवरील समीकरण खूपच बदलले आहे. १९९१ च्या निवडणुकीत राज्यात ९० जागा सुरक्षित होत्या. राममंदिर आंदोलनादरम्यान या जागा भाजपचा बालेकिल्ला मानल्या जात असत. भाजपने या निवडणुकीत ९० मधून ५३ जागा जिंकल्या होत्या; पण यानंतर सातत्याने भाजपचा आलेख घसरत गेला. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप ८५ मधून फक्त ३ वरच विजय मिळवू शकला होता. हे आतापर्यंतचे त्यांचे सर्वात वाईट प्रदर्शन होते. 
 
तेच बसप १९९१ मध्ये ९० सुरक्षित जागांमधून एकावरही आपले खातेदेखील उघडू शकला नव्हता. पण येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा जनाधार वाढत गेला. २००७ मध्ये ते ० वरून ६२ वर पोहोचले. तथापि, २०१२ मध्ये त्यांना ८५ मधून फक्त १५ जागा मिळाल्या, ज्या १९९१ नंतर सर्वात वाईट कामगिरी होती. सपाचे या जागांवर मिळतीजुळती वा जेमतेम कामगिरी राहिली. १९९१ मध्ये ८ जागा जिंकणारी सपाला २०१२ मध्ये ८५ मधून ५८ जागी यश मिळाले.
 
सुरक्षित जागांवर बहुमत मिळवणारा पक्षच दरवेळी राज्यात बनवतो सरकार 
२७ वर्षांत कुणाला किती  जागा 
वर्ष     भाजप     सपा     बसप    काँग्रेस    अन्य

१९९१    ५३    ८    ०    ७    २२
१९९३     ३८    २३    २३    ३    ४
१९९६    ३६    १८    २०    २    १४
२००२    १८    ३५    २४    २    ११
२००७    ७    १३    ६२    ४    ३
२०१२    ३    ५८    १५    ४    ५
 
 यंदा एसटी वर्गासाठी दोन सुरक्षित जागा 
२०१७ मध्ये ८७ जागा आरक्षित. ८५ एससी व २ एसटीसाठी. २०१२ मध्ये एसटीसाठी जागा नव्हती. १९९३ मध्ये सर्वाधिक ९१ जागा सुरक्षित होत्या. 
वर्ष     एसी जागा     एसटी जागा
१९९१    ८९        १
१९९३    ९०        १
१९९६    ८९        १
२००२    ८९        १
२००७    ९८       ००
२०१२    ८५       ००
२०१७    ८५       २

बसपचा विक्रम तोडण्याचे आव्हान 
२००७ उ.प्र विधानसभा निवडणुकीत बसपने राज्यातील ८९ सुरक्षित जागांमधून ६२ जागा मिळवल्या होत्या. या सुरक्षित जागांवर २७ वर्षांत सर्वाधिक जागा जिंकण्याचा विक्रम आहे. यास तोडणे आव्हान आहे. सर्व पक्षांचे पहिले उद्दिष्ट ८७ मधून ५० अधिक जागा जिंकणे आहे; तरच ते सरकार बनवतील.
 
राजकीय पक्षांनी दलितांना आकर्षित करण्यासाठी गेल्या वर्षभरात वापरल्या विविध क्लृप्त्या 
भाजप :  धम्मयात्रा, आंबेडकर स्मारक, भीम अॅपचे कार्ड 
सारनाथहून १७४ दिवसांची धम्म चेतना यात्रा काढली होती. मोदी सरकारने आंबेडकर स्मारक आणि त्यांच्या ५ स्थळांना  पंचतीर्थ जाहीर केले आहे. 
बसप:  दलितांना जमिनींचे  पट्टे आणि विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे वचन 
मायावतींनी जाहीरनाम्यात म्हटले की, सरकार बनले तर दलितांना जमिनींचे पट्टे मिळतील. लॅपटॉपऐवजी दलित विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाईल. 
सपा:  दलित बंधुभाव संमेलन, आरक्षण व आंबेडकर स्मारक निर्माण 
अखिलेशने १७ जातींना अनुसूचित जातींत समावेशाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. दलित बंधुभाव संमेलन, लोहिया निवास व ई-रिक्षा योजनाही सुरू केली. 
कांग्रेस: दलित शिक्षण, सुरक्षा, स्वाभिमान यात्रा आणि वचनपत्र
काँग्रेसनेही दलित शिक्षण, सुरक्षा स्वाभिमान यात्रा काढली. दलितांसाठी ८ कलमी वचनपत्रात   निवास, रोजगार आश्वासने दिली.
बातम्या आणखी आहेत...