आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीमधील पोलिस ठाणी झाली सपा कार्यालये, गुंडाराजमुळे कोर्टालाही हस्तक्षेप करावा लागल्याची टीका - मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फतेहपूर - उत्तर प्रदेशमधील सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे. तेथे ‘गुंडाराज’ आहे. अत्याचार प्रकरणात गायत्री प्रजापती या मंत्र्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयालाच हस्तक्षेप करावा लागला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथील प्रचारसभेत अखिलेश यादव सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. राज्यातील पोलिस ठाणी समाजवादी पक्षाची कार्यालये बनली आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
  
एक महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप गायत्री प्रजापती या मंत्र्यावर आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी शनिवारी प्रजापतींविरोधात गुन्हा दाखल केला. त्याचा संदर्भ मोदींच्या या वक्तव्याला होता.  
अखिलेश यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले की, ‘अखिलेश यांच्या चेहऱ्यावरील चकाकी गायब झाली आहे. त्यांचा आवाज क्षीण झाला आहे. ते भयभीत झाले आहेत.
 
माध्यमांशी बोलताना त्यांना योग्य शब्द वापरण्यासाठी धडपड करावी लागते. यावरून आपण खेळ गमावला असल्याचे त्यांनी स्वीकारले आहे. पोलिस यंत्रणा उत्तर प्रदेशमध्ये एवढी दुर्बल का आहे? तक्रारी का नोंदवून घेतल्या जात नाहीत? ही कुठली संस्कृती? कायदा-सुव्यवस्था सुधारण्याची समाजवादी पक्षाला चिंता नाही. त्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणारे सरकार निवडून द्या,’ असे आवाहन मोदींनी केले.  
 
गायत्री प्रजापती हे अमेठी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. अखिलेश यादव यांनी त्यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेचा उल्लेख मोदींनी केला आणि ‘काँग्रेस-सपा ही युती गायत्रींएवढीच पवित्र आहे,’ असा टोमणा मारला.

  राहुल गांधी यांचे नाव न घेता मोदी म्हणाले की, जे तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना उत्तर प्रदेशमधील स्थिती आपल्या बाजूने नाही याची जाणीव झाली आहे. त्यामुळेच ‘२७ साल, यूपी बेहाल’ अशी घोषणा दिल्यानंतर काँग्रेसला सपाशी युती करावी लागली.  
पुढील स्लाईडवर वाचा सविस्तर बातमी... 
बातम्या आणखी आहेत...