Home | National | Uttar Pradesh | News About Up Mahakoushal Express train in Accident

उत्तर प्रदेशात महाकौशल एक्स्प्रेस रेल्वेगाडीचे आठ डबे रुळावरून घसरुन 52 जण जखमी

दिव्य मराठी | Update - Mar 31, 2017, 03:00 AM IST

उत्तर प्रदेशमधील महोबात बुधवारी मध्यरात्रीनंतर एक रेल्वे अपघात झाला. जबलपूर येथून हजरत निजामुद्दीनकडे निघालेल्या महाकौशल एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले. त्यात ५२ प्रवासी जखमी झाले. अपघाताच्या कारणांच्या चौकशीत दहशतवादी कटाचा पैलूही समाविष्ट आहे

  • News About Up Mahakoushal Express train in Accident
    महोबा (उत्तर प्रदेश)- उत्तर प्रदेशमधील महोबात बुधवारी मध्यरात्रीनंतर एक रेल्वे अपघात झाला. जबलपूर येथून हजरत निजामुद्दीनकडे निघालेल्या महाकौशल एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले. त्यात ५२ प्रवासी जखमी झाले. अपघाताच्या कारणांच्या चौकशीत दहशतवादी कटाचा पैलूही समाविष्ट आहे.

    अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) दलजीत चौधरी यांनी सांगितले की, बुधवारी मध्यरात्रीनंतर हा अपघात झाला. प्राथमिकदृष्ट्या काहीही संदिग्ध आढळले नाही, पण आम्ही सर्व पैलूंचा तपास करत आहोत. एटीएससह रेल्वे आणि एनडीआरएफची पथके अपघाताच्या कारणांचा तपास करत आहेत.
    दुसरीकडे, पोलिस अधीक्षक गौरव सिंह म्हणाले की,प्राथमिक चौकशीत रेल्वेचे रूळ तुटल्याने हा अपघात झाला, असे मानले जात आहे. तपास अहवाल येण्याआधीच ही दहशतवादी घटना असल्याचे म्हणणे योग्य ठरणार नाही. अपघातात ४०० मीटर लांबीच्या लोहमार्गाचे नुकसान झाल्याने १४ रेल्वेगाड्यांना फटका बसला. विशेष म्हणजे याआधी कानपूरजवळ इंदूर-पाटणा एक्स्प्रेस अपघातामागे दहशतवादी कटाचा मुद्दा समोर आला होता

Trending