आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nithari Case Surinder Koli Execution Decision Allahabad High Court Latest News

निठारी हत्याकांड: सुरेंद्र कोलीस आता फाशीऐवजी जन्मठेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- अलाहाबाद उच्च न्यायालयाने नऊ वर्षांपूर्वीच्या निठारी हत्याकांडातील दोषी सुरेंद्र कोलीची फाशीची शिक्षा जन्मठेपेमध्ये परिवर्तित केली आहे. पाच वर्षांपूर्वी २००९ मध्ये याच कोर्टाने कोलीला मृत्यूदंड कायम ठेवण्याचा निकाल दिला होता. परंतु बुधवारी कोर्टाने म्हटले, कोलीच्या दया याचिकेवर निवाडा देण्यात खूप विलंब (तीन वर्षे तीन महिने) झाल्याने आता फाशी देणे घटनाबाह्य ठरेल.

पिपल्स युनियन फॉर डेमोक्रॅटिक राइट्सने (पीयूडीआर) कोलीच्या वतीने जनहित याचिका दाखल केली होती. उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि नंतर राष्ट्रपती यांनी कोलीची दया याचिका अडून ठेवल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. हे जीवनाचा हक्काचे हनन करण्यासारखे आहे. दुसरीकडे कोली सिरियल किलर आहे, असे उत्तर प्रदेश केंद्र सरकारच्या वकिलांचे म्हणणे होते. या प्रकरणात तांत्रिक आधारावर फैसला बदलला जाऊ नये. परंतु अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड आणि न्या. पी.के. एस. बघेल यांच्या न्यायपिठाने हा दावा स्वीकारला नाही. विशेष म्हणजे सुरेंद्र कोलीने सीबीआय समोर १६ मुलींच्या हत्येची कबुली दिली होती. त्यांच्यावर मुलांचे मांस खाण्याचा देखील आरोप होता. त्याला या प्रकरणात फाशीची शिक्षा झाली होती. त्याच्याबरोबर मोनिंदर सिंह पंढेर याला देखील अटक झाली होती. परंतु त्याची आता सुटका झाली. राष्ट्रपतींचे अधिकार मर्यादित करावे लागतील, अन्यथा फाशीचा उद्देशच राहणार नाही- उज्ज्वल निकम, विशेषसरकारी वकील
या निकालाबद्दल काय म्‍हणतात उज्ज्वल निकम वाचा पुढील स्‍लाईडवर...