आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsApp आणि Bluetooth वर चालणारा जगातील पहिला रोबोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीएचयू आयआयटीमधील चार विद्यार्थ्यांनी एक असे अ‍ॅप्लीकेशन तयार केले आहे, ज्याच्या मदतीने मोबइलमधील WhatsApp आणि Bluetooth च्या मदतीने रोबोटला ऑपरेट करता येते. सोशल मिडीयाचे हे दोन्ही सर्वात लोकप्रिय अ‍ॅप्लीकेशन आहेत.

आतापर्यंत WhatsApp आणि Bluetooth चा वापर आपण फक्त व्हिडीओ आणि चाटिंगसाठी करायचो. पण या विद्यार्थांनी अ‍ॅन्ड्राइड मोबाइलवर असणा-या WhatsApp आणि Bluetooth वर चालणारा रोबोट डिझाइन केला आहे.
या युनीक रोबोटमध्ये तुम्ही गेमही खेळू शकता. या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या रोबोटमधील हे तंत्रज्ञान जगात पहिल्यांदाच वापरण्यात आले आहे.


वाचा सविस्तर वृत्त, मोबाइलवर कसा चालेल रोबोट
आयआयटी बीएचयुमध्ये तृतीय वर्षात शिकणारा निखील गुप्ता व द्वतिय वर्षात शिकणारे अमन, प्रविण बंसल आणि सौरभ या चौघांनी अ‍ॅन्ड्राइड मोबाइलमधील अ‍ॅप्लीकेशनवर चालणारा एक रोबोट तयार केला आहे.

निखील सांगतो, की मोबाइल अ‍ॅप्लीकेशन WhatsApp आणि Bluetooth मधून डाटा रिसिव्ह आणि सेन्ड करण्याची स्पिड फास्ट असते. आम्ही असेच एक अ‍ॅप्लीकेशन तयार केले आहे ज्याच्या साहाय्याने WhatsApp आणि Bluetooth वर रोबोट ऑपरेट करता येतो. रोबोटमध्ये एक ब्लूटूथ लावले आहे जे या नवीन अ‍ॅपवर रोबोट चालवण्यासाठी मदत करते.

रोबोटच्या हालचालीसाठी यात कुठले तंत्रज्ञान वापरले आहे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...