आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्‍कृतिक कार्यक्रमात अश्लील डान्‍स, बारबालावर अशा उधळल्‍या नोटा, पाहा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलंदशहर- जिल्‍ह्यात 135 वर्षांपासून सुरू असलेल्‍या एका ऐतिहासिक फेस्‍टिव्‍हलमध्‍ये फिल्‍मी गितांवर बारबालांनी अश्‍लील डान्‍स केला. एक महिन्‍यापासून सुरु असलेल्‍या या सांस्‍कृतिक कार्यक्रमात कृषी प्रदर्शनीही भरवण्‍यात आली होती. येथे अश्‍लील डान्‍स करणा-या बारबालांवर नुसता पैशांचा पाऊस पाडण्‍यात आला.
70 लाख रूपयांची उधळपट्टी....
बजरंग दलाचे विभाग संयोजक हेमंत सिंह म्‍हणाले, 135 वर्षांपासून बुलंदशहरमध्‍ये हा ऐतिहासिक आणि सांस्‍कृतिक कार्यक्रम घेण्‍यात येतो. त्‍यामुळे जिल्‍ह्याची मान खाली गेली आहे. या कार्यक्रमात अश्‍लील डान्‍स नसावा. यामुळे शासकीय बजेटचा दुरूपयोग होत आहे. या कार्यक्रमात शासनाच्‍या कृषी आणि कल्‍याणकारी योजनांचा प्रसार व्‍हावा, मात्र, प्रोत्साहनाच्‍या नावाखाली महिनाभरात 70 लाख रूपयांची उधळपट्टी करण्‍यात येते.
सरकारी कार्यक्रमांमध्‍ये अधिका-यांना रस नाही....
शिवसेनेचे जिलाध्यक्ष सर्वेश राणा म्‍हणाले, यावेळी या सांस्‍कृतिक कार्यक्रमाचा वाइट अनुभव आला. शासकीय कार्यक्रमांमध्‍ये अधिका-यांना रस नाही असे वाटत आहे. संस्कृती आणि मनोरंजनाच्‍या नावाखाली येथे अश्‍लील डांस होत आहे. येथे महिला डान्‍सरवर पाण्‍यासारखा पैसा खर्च केला जातो.
शहर न्यायदंडाधिकारी काय म्‍हणाले....
शहर न्‍यायदंडाधिकारी डी.पी. सिंह म्‍हणाले, यासंदर्भात ते काहीही बोलणार नाहीत. कारण ते एक लहान अधिकारी आहेत. समाजवादी पार्टी मुलायम सिंह यादव यूथ ब्रिगेडचे प्रदेश सचिव अंकित शर्मा यांचे म्‍हणने आहे की, संस्कृतीच्‍या नावावर असले अश्‍लील प्रकार व्‍हायला नको.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, या कार्यक्रमातील डान्‍सचे फोटो...
अखेरच्‍या स्‍लाइड्सवर पाहा, व्‍हिडीओ...