आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: पंपावरील मशीनमध्ये चिप लावा, २०० मीटरवरून आॅपरेट करा, पेट्रोल चोरी करा; गोरखधंदा देशभर?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एसटीएफने चौक-केजीएमयू येथील पेट्रोल पंपावर छापा टाकून अनेक मशीन सील केल्या. - Divya Marathi
एसटीएफने चौक-केजीएमयू येथील पेट्रोल पंपावर छापा टाकून अनेक मशीन सील केल्या.
 लखनऊ- लखनऊमधील पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रॉनिक चिप व रिमोटच्या मदतीने पंपचालक सर्रास पेट्रोल-डिझेलची चोरी करत आहेत. ग्राहकांकडून पूर्ण रक्कम वसूल करून प्रत्यक्षात इंधन मात्र कमी भरले जात आहे. 
 
केवळ ३ हजार रुपयांची चिप मशीनमध्ये लावून हा गोरखंधंदा सुरू आहे. यामुळे पेट्रोल पंपचालक रोज ४० ते ५० हजार रुपयांची वरकमाई करत होते. दरम्यान, हे बिंग फुटताच विशेष पथकाने उत्तर प्रदेशात सात पंपांवर छापे मारून मशीन सील केल्या. दरम्यान, या चिप पुरवठा करणाऱ्या रवींद्र नामक व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून आतापर्यंत १ हजारांवर मशीनमध्ये चिप बसवण्यात आल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशच नव्हे, तर इतर राज्यांतही अशा चिप बसवण्यात आल्या आहेत.
 
यूपीसह इतर राज्यांत एक हजार चिप विकल्या

६% कमी इंधन, लिटरमध्ये ६० मि.लि. फटका
रवींद्र यानेच ही चिप तयार केली असून पंपांवर डिस्पेंसिंग मशीनमध्ये ती लावली जात होती. रिमोटने मशीनमधून गाड्यांत टाकले जाणारे इंधन ६ टक्के कमी येईल, अशी व्यवस्था यात होती. ग्राहक १ लिटरचे पैसे देत होता. मात्र, प्रत्यक्षात ९४० मि. लि. पेट्रोल गाड्यांत टाकले जात होते. असे रिमोट मशीनजवळ उभे राहून हाताळून पंपचालकांचे हस्तक ग्राहकांना लुबाडत होते. 
 
असा सुरू होता काळा धंदा
- पंपांवर ग्रीन सर्किटमध्ये चिप लावली जात होती. या चिप दोन प्रकारच्या होत्या. एक रिमोटने कंट्रोल होत होती. तर, दुसरी चिप कोड नंबरने हाताळली जात होती.
- ग्रीन सर्किटमध्ये चीप लावली की २०० मीटरवरूनही ती ऑपरेट होत होती.
- या घोटाळ्यात दोन-तीन लोक सहभागी असत. पंपावर एक व्यक्ती इंधन टाकत होता, दुसरा कॅश बॅग घेऊन उभा असे. बॅगमध्ये पैशासोबत रिमोट ठेवले जाई.
 
पुढील स्लाइडवर व्हिडिओमधून समजून घ्या कसा चालला होता गोरखधंदा.. 
बातम्या आणखी आहेत...