आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेने नाकारलेल्यांचाच संसदेच्या कामात अडथळा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहराइच - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई जारी ठेवण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, ‘भ्रष्टाचारी आणि बेइमान यांची गय केली जाणार नाही.’ दाट धुक्यामुळे बहराइचमध्ये त्यांचे हेलिकॉप्टर उतरू शकले नाही. त्यानंतर मोदी यांनी लखनऊच्या अमौसी विमानतळाच्या व्हीव्हीआयपी लाउंजमधून फोनवरूनच जाहीर सभेला संबोधित केले. मोदी म्हणाले की, देशाला काळ्या पैशाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा माझा प्रयत्न आहे. पण समाजवादी पक्ष आणि बसपा त्याला विरोध करत आहेत. विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की, जनतेने ज्या पक्षांना नाकारले आहे तेच संसदेचे कामकाज होऊ देत नाहीत. सरकार बेइमान लोकांच्या मागे लागले आहे. बडे लोक पकडले जात आहेत. रोज असंख्य नोटा पकडल्या जात आहेत. मात्र, गरिबांना लुटणारे वाचणार नाहीत. यूपीतील गुंडाराजवर त्यांनी हल्ला केला.
बातम्या आणखी आहेत...