आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेठीत गेला प्रियंका गांधींचा मुलगा रेहान, गावात जेवला, रात्रभर थांबला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी (उत्तर प्रदेश)- कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची मुलगी प्रियंका आणि बिझनेसमन रॉबर्ट वढेरा यांचा मुलगा रेहान मित्रांसोबत मामा आणि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मतदारसंघात गेला होता. यावेळी त्याने गावातील भोजनावर ताव मारला. त्यानंतर खाटेवर मच्छरदाणी लावून रात्र काढली.
ग्रामस्थांशी केली चर्चा
रेहान वढेरा आणि त्याचे मित्र काल (गुरुवार) तीन आलिशान कारमधून अमेठीतील गौरीगंज आणि कौहार गावांमध्ये गेले होते. सेल्फ हेल्प ग्रुपच्या अध्यक्ष सीमा यांच्या घरी ते प्रारंभी गेले. त्यानंतर गावात फिरले. यावेळी रेहान आणि त्याच्या मित्रांनी ग्रामस्थांनी बराच वेळा गप्पा मारल्या. त्यांना बघण्यासाठी अनेक ग्रामस्थ जमा झाले होते. दुपारी त्यांनी एका ढाब्यावर जेवण घेतले. त्यानंतर या गावाचे माजी सरपंच राम अवध पांडे यांच्या घरी गेले. रात्रीचे भोजन तेथेच घेतले. त्यानंतर खाटेला मच्छरदाणी लावून झोप घेतली. आज सकाळी मुंशीगंज येथील गेस्ट हाऊसमध्ये गेले.
राजकारणात आहे रस
गेल्या वर्षी 16 जुलै रोजी रेहान मित्रांसोबत लोकसभेचे कामकाज बघण्यासाठी गेला होता. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत तो राहुल गांधी यांच्यासोबत एका रोड शोमध्ये दिसला होता. त्याला राजकारणात रस आहे हे त्याचे फेसबुक पेज बघितल्यावर दिसून येते. त्याच्या टाईमलाईवर बऱ्याच राजकीय पोस्ट दिसून येतात. महागाईवर भाजपला लक्ष्य करणाऱ्या पोस्ट त्याने फेसबुकवर टाकल्या होत्या. सहारनपूर दंगलीवर राहुल गांधी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेला पाठिंबा दिला होता.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, प्रियंगा गांधी यांच्या मुलगा रेहान.... अमेठीला दिली भेट...