आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi, Narendra Modi Not Fit For PM's Post: Anna Hazare

अण्णा हजारेंचा प्रहार; राहुल आणि मोदी पंतप्रधानपदासाठी पात्र नाहीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फारुखाबाद (उत्तर प्रदेश)- कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी दोघेही पंतप्रधान होण्यास पात्र नाहीत, असे स्पष्ट मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.

अण्णा हजारे म्हणाले, की पंतप्रधानपद हे सन्माननीय पद आहे. त्यासाठी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी दोघेही पात्र उमेदवार नाहीत. गेल्या १० वर्षांमध्ये गुजरात या राज्यात लोकायुक्त स्थापन करण्याच्या मार्गात मोदींनी अडथळे आणले आहेत. भ्रष्टाचार विरोधी मोहिम बळकट करण्यासाठी मोदी इच्छुक नसल्याचे यावरून दिसून येते.

राहुल गांधीसंदर्भात बोलताना अण्णा म्हणाले, की कॉंग्रेस पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात भ्रष्टाचार वाढला आहे. कॉंग्रेसच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार नाहीत. आम्ही सहा कोटी लोकांना गोळा करून भ्रष्टाचार विरोधी मोहिम तीव्र करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सक्षम जनलोकपाल विधेयक आणणे आमचे धेय्य आहे.