आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi News In Marathi, Congress, Politics

कॉंग्रेसच्या खासदारांनी निवड केली तरच पंतप्रधानपदाचा विचार- राहुल गांधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी- जर कॉंग्रेस पक्ष सत्तेत आला आणि पक्षाच्या खासदारांनी माझी पंतप्रधान म्हणून निवड केली तर पंतप्रधानपदाचा निश्चितच विचार करेन, असे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले आहे. राहुल गांधी यांच्या नावाची संयुक्त पुरोगामी आघाडीचा (संपुआ) पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषणा करण्यात यावी, अशी कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून मागणी करण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्याने या कार्यकर्त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
अमेठी या राहुल गांधी यांच्या मतदारसंघात ते दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्याच्या अंतिम दिवशी पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, की कॉंग्रेसमध्ये निवड झालेले खासदार पंतप्रधानांनी निवड करतात. निवडणुकीनंतर जर कॉंग्रेस पक्ष सत्तेत आला आणि खासदारांनी माझी निवड केली तर निश्चितच यावर मी विचार करेन.
एका पत्रकाराने राहुल गांधी यांना यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी उत्तर दिले. पंतप्रधान मनमोहनसिंग यांचीही निवड अशीच करण्यात आली होती. कॉंग्रेसमध्ये अशाच पद्धतीने पंतप्रधानांची निवड केली जाते. याशिवाय इतर कोणतीही दुसरी पद्धत नाही, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीतही राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर करावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी फेटाळून लावली होती.