आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rahul Gandhi Woos Dalits With \'maximum Representation In Polls\' Promise

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल गांधींचा दलित मतांवर डोळा, मायावतींना मात देण्याची योजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ- बहुजन समाज पक्षाकडून दलितांची मते खेचण्यासाठी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आगामी निवडणुकीत दलित समाजाला जास्तीत जास्त उमेदवारी देण्याचे संकेत देऊन मायवतींना मात देण्याची योजना आखली आहे. दलित समाजात नेतृत्वाची कमतरता असल्याचे वक्तव्य मायावती यांनी केले होते. आता दलित समाजाला जास्त उमेदवारी देण्याची घोषणा करून राहुल गांधींनी मायावतींवर अप्रत्यक्षपणे कुरघोडी केली आहे.

समाजिक असमतोलावर राष्ट्रीय चर्चा या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, की आगामी निवडणुकीत दलित समाजाला जास्तीत जास्त उमेदवारी देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. दलित समाज कॉंग्रेसचा कणा आहे. या समाजाने कॉंग्रेसवर विश्वास टाकायला हवा. या सामाजासाठी आमच्या पक्षाची दारे कायम उघडी आहेत.

राहुल गांधी कांशिराम यांच्याबद्दल काय म्हणाले वाचा पुढील स्लाईडवर