आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिजनोर (उत्तर प्रदेश)- चार दिवस उपोषण केल्यानंतरही पोलिसांनी कारवाई न केल्याने अल्पवयीन बलात्कार पीडितेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चार नराधमांनी बलात्कार केल्याचा आरोप या पीडितेने केला आहे. दरम्यान, कोणताही गुन्हा केला नसल्याचा दावा करीत आरोपींनीही धरणे आंदोलन केले आहे.
घटना घडल्यानंतर पीडितेला बिजनोर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे, की आता तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. परंतु, तरीही तिला देखरेखीखाली ठेवणे गरजेचे आहे.
2 फेब्रुवारी रोजी खासगी शिकवणीतून घरी परत येत असताना चार नराधमांनी बलात्कार केला, असा आरोप या पीडितेने केला आहे. या प्रकरणी पीडितेने पोलिस तक्रार दिली आहे. परंतु, पोलिसांनी अद्याप आरोपींना पकडलेले नाही. त्यामुळे पीडित मुलगी उपोषणावर बसली आहे. आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी तिने केली आहे.
यासंदर्भात पीडिता म्हणाली, की नराधमांनी काय केले याचे पोलिसांना काही देणेघेणे नाही. पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. या घटनेला आज बारा दिवस झाले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून पैसे घेतले आहेत. आता पोलिस आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान, पीडितेने ज्या लोकांवर आरोप केले आहेत, त्यांनीही आंदोलन सुरू केले आहे. आम्ही कोणताही अपराध केलेला नाही, असा दावा या आरोपींनी केला आहे.
आरोपींना चोविस तासांत अटक केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी पीडितेला दिले होते. परंतु, आरोपींना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे पीडितेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.