आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामनवमीच्या शोभायात्रेनंतर कानपुरमध्ये दंगलसदृष्य परिस्थिती, बघा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर- येथील रावतपूर परिसरात रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेनंतर दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. आता परिस्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काल (मंगळवार) रात्रीच्या सुमारास झालेल्या हिंसेच्या काही घटनांनंतर स्थानिक प्रशासनाने या भागातील सर्व दुकाने, शाळा, कॉलेजेस बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
रावतपूर परिसरातील सय्यदपूर भागात शोभायात्रा काढण्यावरून दोन्ही समुदायांमध्ये हिंसेच्या घटना घडल्या. दोन्ही समाजाच्या लोकांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक केली. यात आठ जण गंभीर जखमी झाले. शोभायात्रेसोबत असलेल्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुणीही त्यांचे ऐकण्यास तयार नव्हते. त्यानंतर मोठा फौजफाटा बोलविण्यात आला.
काल रात्रीच्या सुमारास पुन्हा हिंसेला सुरवात झाली. काही लोकांनी परिसरातील दुकानांना आग लावली. मोठी जाळपोळ केली. शोभायात्रेच्या मार्गावरून दोन्ही समुदायांमध्ये मतभेद झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. परंतु, रात्रीच्या सुमारास दोन्ही समुदायांच्या दोन तरुणांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि हिंसा पुन्हा सुरू झाली होती.
कानपुरमधील दंगलसदृष्य परिस्थितीची छायाचित्रे बघा पुढील स्लाईडवर