आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saharanpur Dispute Between Two Community Latest News In Marathi

UP च्या सहारनपुरमध्ये भीषण दंगल, दोघांचा मृत्यू, बघा विचलीत करणारे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- हिंसक जमावाने वाहनांना आग लावली.)
मेरठ/सहारनपूर- उत्तर प्रदेशातील सहारनपूर आणि मुरादाबाद या शहरांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. सहारनपूर येथील गुरुद्वाऱ्याच्या जमिनीशी निगडित वादावरुन आज (शनिवार) प्रचंड हिंसाचार भडकला. यामुळे परिसरात संचारबंदी लावण्यात आली असून लष्कराला बोलविण्यात आले आहे.
दुसरीकडे, मुरादाबाद येथील कांठ गावातील मंदिरात लाऊडस्पिकर लावण्याची मागणी विश्व हिंदू परिषद आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी रेटून धरल्याने तणावाचे वातावरण आहे. या परिसरात शांती मार्च काढण्याची कॉंग्रेस कार्यकर्त्यांची योजना होती. परंतु, पोलिस प्रशासनाने परवानगी दिली नसल्याने मार्च रद्द करण्यात आला आहे.
सहारनपूर येथील गुरुद्वाराच्या जमिनीवरून दोन अल्पसंख्याक समुदायात मोठा संघर्ष उफाळून आला आहे. दोन्ही बाजूंनी झालेली दगडफेक आणि गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींमध्ये पोलिसांच्या दोन जवानांचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर इतर भागांमधून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. उग्र जमावावर पोलिसांनी रबरच्या गोळ्या झाडल्या. हिंसाचार झालेल्या भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पीएसी आणि आरएएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. लष्कराच्या जवानांनाही बोलविण्यात आले आहे. हिंसाचार करणाऱ्यांना गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जाळपोळ आणि तोडफोड
उग्र जमावाने सुमारे डझनभर घरांना आग लावली. काही दुकानांची तोडफोडही केली आहे. यावेळी काहींनी पेट्रोल पंपालाही आग लावली. या शिवाय बस स्टॅंडवर उभ्या असलेल्या तीन खासगी बसेसना आग लावली. आगीवर नियंत्रण मिळवायला आलेल्या अग्निशमन दलाच्या आणि पोलिस दलाच्या जवानांवर दगडफेक केली. यात सिटी मॅजिस्ट्रेटसह पाच पोलिस जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मार्केट आणि पेट्रोल पंप बंद
हिंसाचाराच्या घटना घडल्याचे वृत्त पसरल्यावर शहरांमधील बाजारपेठा बंद करण्यात आल्या. शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. एक पेट्रोल पंपाला आग लावण्यात आल्याने सगळे पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहेत. गुरुद्वारा रोडसह घंटाघर, अंबाला रोड आणि लुहानी सराय परिसरात तणावाचे वातावरण आहे.
पुढील स्लाईडवर बघा, सहारनपूर आणि मुरादाबाद शहरातील हिंसाचाराची दृष्ये...