आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samajwadi Party Leader Amarmani\'s Daughter In Law Killed In Accident

मधुमिता हत्याकांडातील आरोपी अमरमणि यांच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिरोजाबाद (उत्तर प्रदेश)- समाजवादी पक्षाचे वादग्रस्त नेते आणि माजी मंत्री अमरमणि त्रिपाठी यांचा मुलगा अमनमणि त्रिपाठी यांची पत्नी सारासिंहचा अपघाती मृत्यू झाला आहे. यावेळी सारा आणि अमन कारमधून लखनऊ येथून दिल्लीला जात होते. एका प्रकरणी न्यायालयाने अमनला फरार घोषित केले आहे. अपघातानंतर पोलिसांनी लगेच अमनला अटक केली. दरम्यान, साराची आई सीमासिंह यांनी अपघातावर संशय व्यक्त केला आहे. साराचे पुन्हा शवविच्छेदन केले जावे. याची उच्चस्तरिय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
दोघांनी सिटबेल्ट बांधले नव्हते
कार प्रचंड वेगात होती. दोघांनी सिटबेल्ट बांधले नव्हते. अमनने अचानक ब्रेक लावला. कारने डिव्हायडरला धडक दिली. सारा उसळून कारच्या समोर असलेल्या काचेवर कोसळली. काच तुटली. डोक्याला गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. यात अमनला अगदी किरकोळ जखमा झाल्या आहेत. दोघेही कारमध्ये असताना पत्नी लगेच मृत्युमुखी पडली आणि अमन केवळ किरकोळ जखमी झाला आहे. यावरुन संशयाचे मोहोळ उठले आहे.
हे प्रश्न विचारले जात आहेत
अमनच्या कारच्या ज्या परिस्थितीत अपघात झाला त्यावरुन संशयाचे मोहोळ उठले आहे. अपघात दुपारी दीड वाजता झाला तरी लखनौ पोलिसांना याची माहिती नव्हती. आमच्या प्रतिनिधीने फिरोजाबादचे पोलिस आयुक्त पीयुष श्रीवास्तव यांना फोन लावला. तेव्हा त्यांना याची काहीच माहिती नव्हती. यावेळी साराचे शपविच्छेदन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी अमनला अटक केल्याची माहिती दिली.
कुटुंबीयांचा विरोध असतानाही केले होते लग्न
कुटुंबीयांचा विरोध असतानाही अमनने सारासोबत आर्यसमाज मंदिरात लग्न केले होते. लखनौमध्ये दोघांची भेट झाली होती. लग्नाच्या वेळी अमन आणि साराचे कुटुंबीय उपस्थित नव्हते. साराची आई राजकारणात सक्रिय आहे.
न्यायालयाने अमनला घोषित केले आहे फरार
एका युवकाचे अपहरण करणे, त्याला बेदम मारणे, खंडणी वसूल करणे आणि खुनाची धमकी देणे यासंदर्भात एका प्रकरणात न्यायालयाने अमनला फरार घोषित केले आहे. तेव्हापासून अमन फरार होता. पोलिस त्याच्या मागावर होते. त्यामुळे अपघात झाल्यानंतर लगेच त्याला अटक करण्यात आली.
मधुमिता हत्याकांडात तुरुंगात आहेत अमरमणि
मधुमिता हत्याकांड प्रकरणी अमरमणि, त्यांची पत्नी आणि इतर आरोपी सध्या तुरुंगात आहेत. मधुमिता कवियत्री होती. त्यावेळी अमरमणि आणि मधुमिता यांचे अफेअर होते. दोघांमध्ये घनिष्ठ संबंध होते. अमरमणि यांच्या पत्नीला हे संबंध मान्य नव्हते. अमरमणि आणि त्यांच्या पत्नीवर मधुमिताची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या झाली तेव्हा मधुमति गर्भवती होती.
पुढील स्लाईडवर बघा, घटनेचे फोटो...