आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samajwadi Party Leader Azam Khan's Letter To Amir Khan

आमिरला आझम खानचे लेटर, म्हणाले- फाळणीत थांबलो त्यांनीच म्हटले 'गद्दार'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ (उत्तर प्रदेश)- समाजवादी पक्षाचे कट्टर मुस्लिम नेते आझम खान यांनी अभिनेता आमिर खानला एक खुले पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की फाळणीच्या वेळी भारतात थांबलेल्या मुस्लिमांना इतर मुस्लिमांनी धार्मिक गद्दार ठरवले होते. आता हिंदुस्तानातील नागरिकही आम्हाला गद्दार म्हणत आहेत. लोकांनी कितीही विरोध केला तरी समाजाला योग्य मार्ग दाखविण्याचे काम तुम्ही करीत राहाल असा मला विश्वास आहे.
आझम यांनी आता लेटरबॉम्ब टाकला आहे. आझम म्हणतात, की आमिरने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पण त्यावर कठोर प्रहार करीत लोकांनी त्याला चक्क दोषी ठरवले आहे. त्यात मलाही जोडण्याचा प्रयत्न केला आहे. मला या पत्राच्या माध्यमातून सांगायचे आहे, की फाळणी झाली तेव्हा हिंदुस्थानात राहिलेल्या मुस्लिमांना धार्मिक गद्दार ठरविण्यात आले होते. काल ते आम्हाला वाईट साईट बोलले. आता आम्ही ज्यांच्यासोबत थांबलो ते आपल्याला वाईट साईट बोलत आहेत.
आझम यांनी केला क्रांतीकारी आणि देशभक्तांचा उल्लेख
आमिरला लिहिलेल्या पत्रात आझम खान यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महापुरुषांचा उल्लेख केला आहे. आझम म्हणतात, की स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. टीपू सुल्तान, बहादुरशाह जफर, मौलाना महंमद अली जौहर, मौलाना शौकल अली, बी अम्मा, हसरत मोहीन, मौलाना शिबली, अशफाक उल्ला खां आणि मौलाना अबुलकलाम आझाद ही नावे त्यात प्रामुख्याने घेतली जातात. या लोकांनी बाबा-ए-कौम महात्मा गांधी, भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि सरदार पटेल यांच्यावर विश्वास ठेवला.
आमिरने देशातच राहावे, कुठे जाऊ नये
उत्तर प्रदेशचे कॅबिनेटमंत्री शिवपाल यादव यांनी आमिर यांना आपल्या राज्यात येण्याचे निमंत्रण दिले आहे. आमिरने देशातच राहावे. कुठे जाऊ नये, असे म्हटले आहे. शिवपाल म्हणाले, की समाजवादी पक्ष आणि नेताजी यांनी कायम कलाकारांचा सन्मान केला आहे. भाजप आणि आरएसएस देशाला विभागण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमचा पक्ष कायम तुमच्या सोबत राहिल.
पुढील स्लाईडवर वाचा, आझम खान यांनी आमिर खानला लिहिलेले पत्र....जसेच्या तशे....