आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sara Killed By SP Leader Amarmani\'s Son Amanmani, Alleges Her Mom

गर्भवती राहिल्यानेच अमनमणिने केला साराचा मर्डर, आई सीमासिंह यांचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- सारासिंहच्या अपघाती मृत्यूबाबत तिची आई सीमासिंह यांनी पुन्हा गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. सीमा म्हणाल्या, की साराचा खून झाला आहे. ती गर्भवती राहिल्याने अमनमणि नाराज होता.
साराच्या भावानेही आरोप केला आहे, की सारा पहिल्यांदा गर्भवती होती तेव्हा त्याने तिचा गर्भपात केला होता. सारा आणि अमनमणिचे मॅरेज सर्टिफिकेटही समोर आले आहे. त्याचा कुणीतरी जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमिवर फिरोजबाद पोलिसांनी सीमा यांच्या घरी जाऊन सविस्तर माहिती घेतली. उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि बाहुबली अमरमणि यांचा अमनमणि मुलगा आहे. कवियत्री मधुमिता शुक्ला यांच्या खून प्रकरणी सध्या अमरमणि तुरुंगात असून आणखी एका खून प्रकरणी अमनमणिला पोलिसांनी अटक केली आहे.
अमनमणिने एक नव्हे केले दोन मर्डर
अमनमणिने एक नव्हे तर दोन खून केले आहेत, असा आरोप सीमासिंह यांनी केला आहे. सीमा यांनी सांगितले, की अमनमणिने साराचा खून तर केलाच पण तिच्या पोटात असलेल्या मुलाचाही खून केला. पोस्टमॉर्टम करताना डॉक्टरांनी निष्काळजीपणा दाखवला आहे. त्यामुळे ही बाब समोर आलेली नाही. मृत्यूपूर्वी साराने मला गर्भधारणेबाबत विचारले होते. त्याची माहिती दिली होती. तेव्हा मी म्हटले होते, की दोघे जोपर्यंत सेटल होत नाहीत तोपर्यंत याची विचार करायला नको. पण तेव्हाच ती गर्भवती होती. त्यामुळे त्याने तिचा खून केला. हा खून अपघात असल्याचे दाखवले.
साराचा केला होता गर्भपात
साराचा भाऊ हर्ष याने सांगितले, की पहिल्यांदा सारा गर्भवती राहिली तेव्हा अमनमणिने गर्भपात करायला भाग पाडले. दुसऱ्यांदा मात्र ती यासाठी तयार नव्हती. त्यामुळे दोघांमध्ये भांडणे होत होती. साराने मुलाला जन्म दिला असता तर तो अमनचा वंशाचा दिवा ठारला असता. अमनला तसे नको होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अमनमणि आणि साराच्या लग्नाचे सर्टिफिकेट... आणि इतर फोटो...