कानपूर- दोन हजार रुपये महिना कमवणारी उर्मिला यादव एका रात्रीत जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती झाली. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी, स्टील किंग लक्ष्मी निवास मित्तल यांच्याजवळ जेवढे पैसे नाहीत तेवढे उर्मिलाच्या बॅंक खात्यात एसबीआयने जमा केले. धक्का बसला ना तुम्हाला. पण हे शंभर टक्के खरे आहे. तिला जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती करण्याचे श्रेय जाते ते एसबीआयला. बॅंकेच्या सर्व्हरने केलेल्या चुकीने उर्मिलाच्या खात्यात तब्बल 9 लाख 57 हजार कोटी रुपये ट्रान्सफर झाले.
लखनपूर येथील यूपीएसआयडीसीमध्ये भारतीय स्टेट बॅंकेची मिनी ब्रांच आहे. याला विस्तारीत पटल असेही म्हटले जाते. आरके नगर शाखेशी ही ब्रांच निगडित आहे. यात मदारपूर विनायकपूर रहिवासी उर्मिला यादवचे खाते (क्रमांक- 35014400299) आहे.
आधी शाखेत होते दोन हजार रुपये
उर्मिलाने अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे बॅंकेने तिला एक पत्र लिहिले होते. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ती बॅंकेत आली होती. सध्या बॅंकेतून जास्ती जास्त 9.99 लाख रुपये काढण्याची परवानगी तिला आहे. तिच्या बॅंक खात्यात सध्या केवळ दोन हजार रुपये होते. दरम्यान, एसबीआयच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे 9 लाख 57 हजार कोटी रुपये तिच्या खात्यात जमा झाले. पासबुक अपडेट करायला क्लार्ककडे गेली असता तिला ही माहिती मिळाली.
14 अंकी बॅलेंस बघून झाली चकीत
पासबुक अपडेट केल्यावर उर्मिलाने क्लर्कला विचारले, की माझ्या खात्यात किती पैसे जमा आहेत? त्यानंतर क्लर्कने पासबुकमधील संख्या वाचली. त्याला तर धक्काच बसला. खात्यात एकढी मोठी रक्कम बघून तो व्यवस्थापकाकडे गेला. त्यानंतर त्यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. नेमके झाले तरी काय, तिला काही समजेना. अखेर क्लार्कने तिला सांगितले. रात्री उशीरा तिच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली होती. आती ही चुक दुरुस्त करण्यात आली आहे.
पुढील स्लाईडवर बघा, उर्मिलाच्या बॅंक खात्याचे पासबुक....