आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Seema\'s Mother Alleged That Her Daughter Was Murdered In UP

अहो, माझ्या मुलीचा मर्डर झालाय, नवरा तिला बेदम मारायचा -अमरमणिची सून साराची आई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- मधुमिता शुक्ला खून प्रकरणी शिक्षा झालेले समाजवादी पक्षाचे बाहुबली नेते आणि माजी मंत्री अमरमणि त्रिपाठी यांची सून आणि अमनमणि याची पत्नी सारा हिच्या मृत्यूला एक नवीन वळण आले आहे. साराची आई सीमासिंह यांनी आज (सोमवार) या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिस महासंचालकांची भेट घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, की माझ्या मुलीचा मृत्यू अपघाती नसून तिचा खून करण्यात आला आहे. त्यांनी महासंचालकांना एक लेटर दिले असून त्यात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
सीमासिंह म्हणाल्या, की साराचा नवरा बेदम मारायचा
सीमासिंह यांनी पोलिस महासंचालक जगमोहन यादव यांना सांगितले, की मला फिरोजाबाद येथून आतली माहिती मिळाली आहे. माझ्या मुलीचा चार तासांपूर्वीच खून झाला होता. त्यानंतर अपघाताचा बनाव करण्यात आला. यामागे मोठे कारस्थान आहे. मलाही ठार मारण्याचा कट रचण्यात आला आहे. मला पोलिस संरक्षण मिळावे.
अमनमणि जवळपास दररोज साराला मारायचा. ही दुर्घटना घडण्यापूर्वी तीन दिवस आधी तिला बेदम मारले होते. गोमतीनगर विरामखंड येथील घरी माझा मुलगा सिद्धार्थ याच्या समोरच त्याने तिला मारले होते. यावेळी सिद्धार्थला हे फार विचित्र वाटले. पण तो बहिणीसाठी गप्प बसला. सारा हे आम्हाला सांगत नव्हती. पण अमनमणिचे मारणे काही थांबत नव्हते. एकदा तिने याची तक्रार माझ्याकडे केली होती.
कायद्यावर आहे विश्वास
सीमासिंह म्हणाल्या, की माझा कायद्यावर विश्वास आहे. पण हे प्रकरण सीबीआयला सोपविण्याची गरज आहे. कायदा सर्वांसाठी सारखा आहे. असे नसते तर अमरमणि सारखा बाहुबली नेता तुरुंगात गेला नसता. मी मुलगी गमावली आहे. तिला न्याय मिळवून देणे माझे कर्तव्य आहे. मला आता कशाचीही भीती नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या प्रकरणातील इतर फोटो....