Home »National »Uttar Pradesh» Shahi Imam Badhtar Of Tipu Sultan Mosque In Kolkata Divya Marathi

दिव्य मराठी कोलकात्यातील टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम बडतर्फ

दिव्य मराठी | May 20, 2017, 03:43 AM IST

  • दिव्य मराठी कोलकात्यातील टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम बडतर्फ
चर्चेचे कारण- कोलकात्याच्या टिपू सुलतान मशिदीच्या इमाम पदावरून बरकती यांना हटवण्यात आले आहे.
बरकती हे वादग्रस्त वक्तव्यांमुळे सदैव चर्चेत असतात. केंद्राने वाहनांवरील लाल दिव्यांवर बंदी घातली तेव्हा बरकती यांनी लाल दिवा काढण्यास नकार दिला. १ मे रोजी लागू या आदेशाचा त्यांनी ९ मेपर्यंत अवमान केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. लाल दिवा ही ब्रिटिशांची देणगी असून सर्व लोक दिवे काढतील तेव्हाच आपण काढू, असे त्यांचे म्हणणे होते. नोटाबंदीच्या काळातही बरकती यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
तीन दशकांपासून टिपू सुलतान मशिदीचे इमाम असलेले बरकती यांनी बांगलादेशच्या लेखिका तस्लिमा नसरीन व कॅनडाचे लेखक तारेक फतेह यांच्याविरोधात फतवा काढला होता. बरकती हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्या बरकतींना राखी बांधतात. याच संबंधामुळे बरकती यांच्या मुलास अनेक कंत्राटे मिळालेली आहेत. कुख्यात दहशतवादी लादेन मारला गेल्यानंतर बरकतींनी मशिदीत विशेष प्रार्थना ठेवली होती.

मौलाना बरकती यांनी धर्माबाबत बोलावे, उगाच राजकारण करू नये, असे मत मशिदीजवळील दुकानदारांनी मांडल्यानेे बरकती यांच्या मुलाने दुकानदारांशीच बाचाबाची केली. २०१० मध्ये मुस्लिम युवकाचे एका तृतीयपंथीयाशी लग्न लावून दिल्यामुळे बरकती बदनाम झाले. मात्र, नवरी पडद्यात असल्यामुळे आपल्याला ती महिला आहे की पुरुष हे कळू न शकल्याने असे घडल्याचे स्पष्टीकरण बरकती यांनी दिले होते. स्पष्टीकरण देऊनही लोकांचा रोष कमी झाला नव्हता.
काही रुपयांच्या बदल्यात ते अल्पवयीन मुलांचे लग्न लावून देत असल्याचा आरोप त्यांच्यावर मुस्लिम धर्मातीलच काही लोकांनी केला होता. मात्र, बरकतींनी तो फेटाळला. टिपू सुलतान मशिदीचे इमामपद त्यांच्याकडे वारसाहक्काने चालत आलेले आहे. त्यांचे वडील कोलकात्याचे शाही इमाम होते. मागील ३० वर्षांपासून बरकती या पदावर असून त्यांनी राष्ट्रविरोधी टीका केल्यामुळे वक्फ बोर्डाने त्यांची हकालपट्टी केली आहे. मात्र, बरकती पायउतार होण्यास तयार नाहीत.

Next Article

Recommended