आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात समाजवादी सेक्युलर मोर्चाची स्थापना, काकांचा पुतणे अखिलेश यांना पुन्हा दणका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - समाजवादी पार्टीतील दुफळी पुन्हा एकदा उघड झाली आहे. पक्षाचे नेते शिवपाल सिंह यादव यांनी शुक्रवारी समाजवादी सेक्युलर मोर्चाची स्थापना करत असल्याचे जाहीर केले. मोर्चाचे नेतृत्व नेताजी करतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.  

अलीकडेच शिवपाल यांनी अखिलेश यांना इशारा दिला होता. पक्षाची सूत्रे मुलायम यांच्याकडे तीन महिन्यांत देण्यात यावीत, अन्यथा नवा धर्मनिरपेक्ष मंच स्थापन करण्याचे संकेत त्यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर शिवपाल यांनी शुक्रवारी ही भूमिका जाहीर केली. ते मूळ गावी इटावाह येथे पत्रकारांशी बोलत होते. सामाजिक न्यायासाठी समाजवादी सेक्युलर मोर्चाची गरज आहे. मुलायम त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील. इटावाहमध्ये वडिलोपार्जित निवासस्थानी शुक्रवारी सकाळी झालेल्या एका बैठकीनंतर त्यांनी मतभेद किती टोकाला गेले आहेत, हे सांगणारी भूमिका मांडली. मात्र, नवीन मोर्चा नेमके काय काम करणार आहे, हे मात्र शिवपाल यांनी स्पष्ट केले नाही. अर्थात समाजवादी पार्टीच्या विरोधात हा मोर्चा निवडणुकीत लढणार आहे का? किंवा समाजवाद्यांना एकत्र आणले जाणार आहे, हे त्यांनी सांगितले नाही.  
 
निवडणुकीपूर्वी मोठे नाट्य  
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पार्टीत मोठे नाट्य पाहायला मिळाले होते. शिवपाल यांनी पुतणे अखिलेश यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवले होते. त्यानंतर अखिलेश यांनी काकांना कॅबिनेटमधून बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यावरून दोन्ही नेत्यांच्या समर्थकांत सत्तासंघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर समाजवादी पार्टीने अखिलेश यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती. परंतु जनतेने त्यांना पराभूत केले. सत्ता भाजपकडे गेली. त्या अगोदर मुलायम यांनी अखिलेश यांच्यावर पक्षाच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करत मुलगा जबाबदार असल्याचे म्हटले होते. जो मुलगा वडिलांशी प्रामाणिक राहू शकत नाही तो इतरांशी राहू शकत नाही, हे हुशार मतदारांना चांगल्या प्रकारे समजते, असे मुलायम यांनी म्हटले होते.  
 
१९९२ मध्ये स्थापना 
मुलायमसिंह यांनी १९९२ मध्ये पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर ते तीनवेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले होते. केंद्रात देखील त्यांनी मंत्रिपद भूषवले होते. त्यांच्याकडे संरक्षण विभागाची जबाबदारी होती. परंतु मुलाने बंड केल्याने ते हतबल झाल्याचे दिसून आले. त्यांचे संघटनेवरील पकड कमी झाली आहे. 
 
वचन पाळावे  
अखिलेश यादव यांनी पक्षाची सूत्रे मुलायम यांच्याकडे सोपवण्याचे वचन दिले होते. या वचनाला त्यांना आता जागावे. जेणेकरून आपण सर्व मिळून समाजवादी पार्टीला आणखी बळकट करू शकू. मीदेखील त्यांना तीन महिन्यांचा अवधी दिला होता. अन्यथा मला नव्या मोर्चाच्या वतीने निवडणूक लढवावी लागणार आहे, असे शिवपाल यांनी सांगितले. राज्यात समाजवादी पक्षातील कार्यकर्त्यांत कमालीची संभ्रमावस्था पाहायला मिळू लागली आहे. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...