मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश)- खतौली येथील कैलवडामध्ये 12 च्या विद्यार्थीनीवर गेल्या तीन वर्षांमध्ये अनेकदा सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. आरोपी आणि पीडित तरुणीचे धर्म वेगवेगळे असल्याने आता याला धार्मिक रंग चढला आहे. गावात तणावाचे वातावरण पसरले असून पोलिस पथक तैनात करण्यात आले आहे.
कोण आहे गॅंगरेपचे आरोपी
- पीडित तरुणीच्या कुटुंबाने 6 तरुणांवर आरोप केले आहे.
- पोलिसांनी पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी केली आहे.
- पोलिस अधिकारी जोगेंद्र पाल यांनी सांगितले, की आरोपींना अटक केली जाणार आहे.
काय सांगितले पीडितेने
- तीन वर्षांपूर्वी सहा जण मला पळवून घेऊन गेले होते.
- त्यावेळी त्यांनी माझ्यावर बलात्कार केला. त्याची व्हिडिओ क्लिप तयार केली.
- व्हिडिओ क्लिप इंटरनेटवर टाकण्याची धमकी देऊन वारंवार माझ्यावर बलात्कार केले.
- गावातील अनेक मुलींसोबत त्यांनी असे केले आहे. भीतीमुळे मुली कुटुंबीयांना काही सांगत नाहीत.
अशी अनेक प्रकरणे
- माजी ब्लॉक प्रमुख वीरेंदरसिंह यांनी आरोपींवर पोलिस कारवाई होत नसल्याचा आरोप करुन पंचायत बोलविण्याचा इशारा दिला आहे.
- जनपदमध्ये अशी अनेक प्रकरणे घडली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आशा वर्करने केली आत्महत्या
- मुजफ्फरनगरमध्ये आणखी एक असेच प्रकरण उघडकीस आले होते. बलात्काराचा एमएमएस लिक झाल्यानंतर आशा वर्करने आत्महत्या केली होती.