आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा मुलायमसिंह यांच्या दुसऱ्या बायकोच्या मुलाला, अखिलेशचा आहे सावत्र भाऊ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यांचा लहान मुलगा प्रतिक यादव याच्याबद्दल फारच थोडी माहिती लोकांना आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा प्रतिक सावत्र भाऊ आहे. त्याला राजकारणापासून दूर राहणे आवडते. पण त्याची पत्नी अपर्णा हिने राजकारणात यावे असे त्याला वाटते. प्रतिक सध्या व्यवसाय करतो.
अपर्णा हिलाही राजकारणात यायचे आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपर्णाला प्रचार कामात सहभागी व्हायचे होते. पण मुलायमसिंह यासाठी तयार नव्हते.
यादव कुटुंबातील महिला राजकारणा याव्यात, असे मुलायमसिंह यांना वाटत नाही. त्यांनी डिंपल यादवलाही विरोध केला होता. परंतु, अखिलेश यांच्या आग्रहापुढे त्यांना मवाळ धोरण घ्यावे लागले. प्रतिकने स्वतः राजकारणात यावे असे मुलायम यांना वाटते.
अखिलेशचा सावत्र भाऊ आहे प्रतिक
मुलायम यांचे थोरडे चिरंजिव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि प्रतिक यादव सावत्र भाऊ आहेत. अखिलेश यांची आई मालती देवी मुलायम यांची पहिली पत्नी तर प्रतिकची आई साधना यादव दुसरी पत्नी आहे. 2003 मध्ये मालती देवी यांचे निधन झाले. मुलायम यांनी अनेक वर्ष दोन पत्नी असल्याचे कबुल केले नव्हते. परंतु, फेब्रुवारी 2007 मध्ये सुप्रीम कोर्टासमोर त्यांना हे मान्य करावे लागले.
बॉडी बिल्डर आहे प्रतिक
1988 मध्ये प्रतिकचा जन्म झाला. तो आधी प्रोफेशनल बॉडी बिल्डर होता. आजही त्याचे शरीर पिळदार आहे. आंतरराष्ट्रीय बॉली बिल्डिंग वेबसाईटने प्रतिकला ‘द इंटरनेशनल ट्रांसफॉर्मेशन ऑफ द मंथ’ या पुरस्काराने गौरवले आहे. विश्वास बसणार नाही पण कधी काळी प्रतिकचे 103 वजन होते. 103 किलो ते 67 किलो वजनाचा त्याचा प्रवास फार रंजक आहे.
अशी मिळाली प्रेरणा
काही वर्षांपूर्वी प्रतिक खुप आजारी पडला होता. उपचारांमुळे त्याचे वजन वाढले होते. यावेळी त्याचे वजन 103 किलो झाले होते. तेव्हा मुलायमसिंह यांनी त्याला वजन कमी करण्यास सांगितले. जर दहा किलो वजनही कमी केले तर बक्षिस मिळेल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रतिकने जीम जॉईन केली. काही दिवसांत त्याने 15 किलो वजन कमी करुन दाखवले.
कोण आहे अपर्णा यादव
लखनौच्या वरिष्ठ पत्रकाराची अपर्णा मुलगी आहे. अपर्णा आणि प्रतिक लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. सप्टेंबर 2010 मध्ये त्यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर नोव्हेंबर 2011 मध्ये लग्न झाले. अपर्णाला राजकारणात प्रवेश करायचा आहे. पण तिच्या सासरच्या मंडळीचा याला विरोध आहे.
पुढील स्लाईडवर बघा, बॉडी बिल्डर प्रतिक... आणि अपर्णासोबतचे फोटो....