आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SP Leader Amarmani\'s Son Amanmani Had Relation With Many Women

अमनमणिचे अनेक तरुणींसोबत होते संबंध, साराने महिला हेल्पलाईनला केली होती तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि बाहुबली अमरमणि त्रिपाठी यांचा मुलगा अमनमणि याची पत्नी सारासिंह हिच्या मृत्यु संदर्भात आणखी एक खुलासा झाला आहे. काही दिवसांपूर्वी साराचा एक अपघातात संशयात्पद मृत्यू झाला. तिच्या आईने हा खून असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी सुरु केली आहे. साराच्या मोबाईलचा डाटा उपलब्ध झाला आहे. अमनमणिचे अनेक तरुणींसोबत संबंध होते, असे त्यातून स्पष्ट झाले आहे. तो साराला मारहाणही करायचा. याची तक्रार तिने महिला हेल्पलाईनला केली होती.
लग्न झाल्यानंतर दोनच्या महिन्यात दोघांमध्ये तणाव
साराची बहिण निती मिश्राने काही फोटो जाहीर केले आहेत. तिने सांगितले, की अमनमणि साराला मारहाण करायचा. एका फोटोत तिच्या डोळ्यावर मारल्याची जखम दिसून येते. अमनमणिचे आणखी काही मुलींसोबत संबंध असल्याचे साराला लग्नाच्या काही दिवसांनी समजले होते. याचा जाब तिने अमनमणिला विचारला होता. त्यानंतर दोघांमध्ये तणावाचे वातावरण होते. दोघांमध्ये भांडण झाले की अमनमणि तिला मारहाण करायचा.
कुटुंबीयांचा विरोध असतानाही केले होते लग्न
कुटुंबीयांचा विरोध असतानाही अमनने सारासोबत आर्यसमाज मंदिरात लग्न केले होते. लखनौमध्ये दोघांची भेट झाली होती. लग्नाच्या वेळी अमन आणि साराचे कुटुंबीय उपस्थित नव्हते. साराची आई राजकारणात सक्रिय आहे.
न्यायालयाने अमनला घोषित केले आहे फरार
एका युवकाचे अपहरण करणे, त्याला बेदम मारणे, खंडणी वसूल करणे आणि खुनाची धमकी देणे यासंदर्भात एका प्रकरणात न्यायालयाने अमनला फरार घोषित केले आहे. तेव्हापासून अमन फरार होता. पोलिस त्याच्या मागावर होते. त्यामुळे अपघात झाल्यानंतर लगेच त्याला अटक करण्यात आली.
मधुमिता हत्याकांडात तुरुंगात आहेत अमरमणि
मधुमिता हत्याकांड प्रकरणी अमरमणि, त्यांची पत्नी आणि इतर आरोपी सध्या तुरुंगात आहेत. मधुमिता कवियत्री होती. त्यावेळी अमरमणि आणि मधुमिता यांचे अफेअर होते. दोघांमध्ये घनिष्ठ संबंध होते. अमरमणि यांच्या पत्नीला हे संबंध मान्य नव्हते. अमरमणि आणि त्यांच्या पत्नीवर मधुमिताची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या झाली तेव्हा मधुमति गर्भवती होती.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, साराचे फोटो.... तिच्या डोळ्यांवर झालेली जखम... दोघांमधील मोबाईल एसएमएस संवाद...