Home »National »Uttar Pradesh» Student Parents Unite Against Arbitrary Charging School

मनमानी शुल्क घेणाऱ्या शाळेविरुद्ध विद्यार्थिनींच्या पालकांची एकजूट

उत्तर प्रदेशच्या शामली पंचायतीने हुरमंजपुरा गावातील ९० विद्यार्थिनींना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला. शाळा व्यवस्थापन मनमानी शुल्क आकारत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

दिव्य मराठी नेटवर्क | May 19, 2017, 01:59 AM IST

  • मनमानी शुल्क घेणाऱ्या शाळेविरुद्ध विद्यार्थिनींच्या पालकांची एकजूट
शामली :उत्तर प्रदेशच्या शामली पंचायतीने हुरमंजपुरा गावातील ९० विद्यार्थिनींना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला. शाळा व्यवस्थापन मनमानी शुल्क आकारत असल्याचा त्यांचा आरोप आहे. वाटेल तेव्हा शुल्क वाढवण्यात येते. शाळेतूनच वह्या-पुस्तके खरेदी करण्याचा दबाव आणला जातो. तसे न केल्यास विद्यार्थिनींना मारहाणही होते.
हे प्रकरण कांधला ठाणा क्षेत्रातील हुरमंजपुरा गावातील आहे. येथे ग्रामस्थांनी शुल्कवाढीविरुद्ध पंचायत भरवून गावातील ९० विद्यार्थिनींना शाळेत न जाण्यास सांगितले. शाळेचे शुल्क अति वाढवल्याचा त्यांचा आरोप आहे. शाळेतून पुस्तके खरेदीचा दबावही टाकण्यात आला. विद्यार्थिनींनी याला विरोध केला तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली. यासंबंधी शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Next Article

Recommended