गाजीपूर- उत्तर प्रदेशात नुकत्याच बोर्डाच्या परिक्षा पार पडल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी परिक्षकांना प्रलोभन दाखविण्याचे अनेक प्रकार घडले. काहींनी लाच देण्यासाठी उत्तर पत्रिकेत 100 च्या नोटा लावल्या तर काहींनी I LOVE YOU म्हणत चक्क लव्ह लेटर लिहिले. काहींनी तर उत्तर लिहिण्याऐवजी
आपली आर्थिक परिस्थिती किती वाईट आहे, आपण कोणत्या संकटांना सामोरे जात आहोत हे लिहिले. परिक्षकांचा यावर विश्वास बसावा यासाठी उत्तर पत्रिकेत स्वतःचे फोन नंबरही लिहिले. यामुळे आशियातील सर्वांत मोठा बोर्ड असलेल्या उत्तर प्रदेश बोर्डाच्या परिक्षा एक गंमत झाल्या आहेत.