आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Super Hercules Aircraft News In Marathi, Indian Airforce

एक हजार कोटींच्या सुपर हर्क्युलस विमानाला अपघात; पाच जवानांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वायुसेनेचे एक हजार कोटींचे ‘सी 130 जे सुपर हर्क्युलस’ या मालवाहू विमानाच्या शुक्रवारी झालेल्या अपघातात पाच जवानांचा मृत्यू झाला. या पाच जणांमध्ये दोन विंग कमांडर, दोन स्क्वॉड्रन लीडर आणि एका वारंट अधिकार्‍याचा समावेश आहे.

सुपर हर्क्युलस हे जगातील सर्वात भरवशाचे मालवाहू विमान समजले जाते. सुपर हर्क्युलसने सकाळी दहा वाजता आगर्‍यामधून उड्डाण घेतले होते. हे विमान रुटीन लाइंग ट्रेनिंग मिशनवर होते. राजस्थानच्या करोली जिल्ह्यात चंबळ नदीजवळ या विमानाचा अपघात झाला. खाली असलेल्या दगडांना धडकताच विमानात आग लागली. गुराख्यांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली. या अपघातात विंग कमांडर प्रशांत जोशी, राजीव नायर, स्क्वॉड्रन लीडर कौशिक मिर्शा, आशिष यादव आणि क्रू मेंबर के. पी. सिंह यांचा मृत्यू झाल्याचे वायुसेनेच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी सांगितले. अपघाताच्या चौकशीचे आदेश दिल्याचेही ते म्हणाले.

टँक आणि जीप घेऊन उडण्याची क्षमता
सुपर हक्यरुलस विमानामध्ये 20 टन वजन म्हणजेच टँकसह अनेक जीप घेऊन उडण्याची क्षमता होती. सलग 12-14 तास आकाशात राहण्याची क्षमता या विमानात होती. सुमारे 97 फूट लांबी असूनही हे विमान लहान रनवेवरही उतरू शकत होते.

अमेरिकेकडून खरेदी केली होती सहा विमाने
वायुसेनेने तीन वर्षांपूर्वी आपल्या ताफ्यात सी 130 जे सुपर हर्क्युलस हे विमान सामील केले होते. सुमारे चार वर्षांपूर्वी अमेरिकेकडून 6 हजार कोटी रुपयांत याची खरेदी करण्यात आली होती. म्हणजेच या एका विमानाची किंमत एक हजार कोटी रुपये होती.

मदत करणारा मगरीच्या तोंडी
अपघातानंतर मदत करण्याच्या हेतूने अनेक गावकर्‍यांनी नदीत उड्या घेतल्या. त्यांना कोणाचेही प्राण वाचवण्यात यश आले नाही. त्याउलट नदीतील मगरीने त्यांच्यापैकी एका गावकर्‍याची शिकार केली.

पुढील स्लाईडवर वाचा सुपर हर्क्युलस विमानांची सविस्तर माहिती....