आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tap, Toilet Kit And Other Accessories Gone Missing From Mahamana Express

कधी सुधारणार भारत: या 15 PHOTOS मध्ये बघा कशी लावली मॉडर्न रेल्वेची वाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी (उत्तर प्रदेश)- मोठा गाजावाजा करुन भारतीय रेल्वेत मॉडर्न स्वरुपातील कोच सामिल करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवी झेंडी दाखवून हे कोच असलेल्या महामना एक्सप्रेसचे उद्घाटन केले होते. पण या डब्यांमधील नळाच्या तोट्या, टॉयलेट किट्स आणि इतर समानाची चोरी झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळाल्यावर एक टीम डब्यांची तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आली होती. त्यानंतर गायब झालेल्या अॅक्सेसरीजची लिस्ट तयार करण्यात आली.
शनिवारी सकाळी काय झाले
- महामना एक्सप्रेस दिल्ली येथून केंट स्टेशनवर आली. आरपीएफ टीमने डब्यांची तपासणी केली.
- वॉश बेसिन, बर्थ, बॉटल स्टॅंड, टॉयलेट किट्स यांची तपासणी करुन चोरी गेलेल्या सामानाची लिस्ट तयार करण्यात आली.
पण सेक्युरिटी स्टाफ गप्प
- या ट्रेनमधील अॅक्सेसरीजची चोरी झाल्याची माहिती देण्यास जीआरपी आणि आरपीएफ अधिकाऱ्यांनी इन्कार केला.
- ट्रेनमधील सेक्युरिटी स्टाफनेही माहिती दिली नाही.
- पण एका प्रवाशाने याचा खुलासा केला. आता या अॅक्टेसरीज बदलण्यात आल्या आहेत असेही सांगितले.
कशी मिळाली चोरीची माहिती
- गुरुवारी ही ट्र्रेन दुसऱ्यांदा दिल्ली येथून वाराणसीला आली. स्वच्छतेसाठी ट्रेन यार्डमध्ये आणण्यात आली. तेव्हा नळांच्या तोट्या आणि टॉयलेट किट्ससह काही सामान गायब असल्याचे आढळून आले.
- काही प्रवाशांनी ही चोरी केली असावी अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
- शुक्रवारी रात्री चिफ रिजनल मॅनेजर आर. पी. चतुर्वेदी यांनी सांगितले, की या संदर्भात मला कोणतीही माहिती मिळालेली नाही.
पुढील स्लाईडवर वाचा, अगदी विमानासारख्या सुविधा आहेत महामना एक्सप्रेसमध्ये....