आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नि:स्वार्थी वृत्तीने काम करणाऱ्या रा. स्व. संघाला सांप्रदायिक ठरवले जाते; योगी आदित्यनाथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 लखनऊ - ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) नि:स्वार्थीपणे काम करत असतानाही ही संघटना सांप्रदायिकता पसरवत अाहे, अशी टीका होत आहे. अखेर कोण सांप्रदायिक आहे आणि कोण राष्ट्रवादी या मुद्द्यावर देशात एक वेळ चर्चा व्हायलाच हवी. जे लोक मतपेढी बनवून समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत ते स्वत:ला मानवतावादी म्हणत आहेत,’ असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी व्यक्त केले.
 
योगी म्हणाले की, आम्ही आपला इतिहास विसरलो आहोत. भारतात अनेक विदेशी आक्रमकांनी हल्ले केले आहेत. आपण आपला इतिहास विसरलो तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण समाजाला भोगावा लागेल. अशफाक उल्ला खान, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, शहीद अब्दुल हमीद यांचा सन्मान करत नाही, असा कुठला भारतीय आहे? पण जे लोक बाबर, घौरी यांसारख्या लोकांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करतात, त्यांचे स्थान कुठे असावे, याचा विचार करण्याची गरज आहे.
महापुरुषांचा इतिहास अभ्यासक्रमात येणार : योगी म्हणाले की, महाराजा सुहेलदेव यांना इतिहासात जेवढी जागा मिळायला हवी होती, तेवढी मिळाली नाही. एका कटानुसार अशा महापुरुषांची नावे हटवण्यात आली. या सर्व महापुरुषांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. महापुरुष कोण हे आपण जोपर्यंत मुलांना सांगणार नाही तोपर्यंत त्यांना ही  माहिती कशी मिळेल? इतिहासाची मोडतोड करून तो आपल्या फायद्यासाठी वापरण्यात आला आहे. स्वातंत्र्यलढ्याला आमचा विरोध होता, असे सांगितले जात आहे. ज्यांनी हा कट रचला, त्यांचा पर्दाफाश करण्याची गरज आहे.
बातम्या आणखी आहेत...