लखनऊ - उत्तर प्रदेशातील निवडणुकीदरम्यान नितीशकुमार यांनी प्रदेशाध्यक्ष सुरेश निरंजन यांची पक्षातून हकालपट्टी केली. या निर्णयाच्या निषेधार्थ संयुक्त जनता दलाच्या प्रदेश कार्यकारिणीतील 82 सदस्यांनी राजीनामे दिले. निरंजन यांची हकालपट्टी करणे लोकशाहीविरोधी असल्याचे या सदस्यांनी म्हटले आहे.