आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Village Has Not Single Toilet Daughter In Law Goes To Maternal House Jhansi News

VIDEO: या गावात नांदत नाही एकही सून; अनेक तरुण विवाहाच्या प्रतिक्षेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालिवूडच्‍या 'मातृभूमी' चित्रपटात एक टॅग लाईन दाखवण्‍यात आली आहे. "A Nation Without Women." या चित्रपटाची प्रचीती येण्‍यासाठी तुम्‍हाला नक्कीच एकदा या गावाला भेट द्यावी लागेल. झांशी जवळच्‍या केशवपुरची आवस्‍था सध्‍या या चित्रपटाच्‍या कथानकाप्रमाणे असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

झांशीपासून 10-12 किमी अंतरावर असलेल्‍या केशवपूर गावातील अनेक महिलाद घर सोडून जात आहेत. 5000 लोकसंख्‍या असलेल्‍या या गावता महिलांचे प्रमाण फक्‍त 1500 आहे. गावातील महिलांची संख्‍या मोठ्या प्रमाणात घटत असल्‍यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण्‍ा झाले आहे. इतर गावातील लोकांनाही या गावात जाणे आवडत नसल्‍यामुळे गावातील मुलांच्‍या लग्‍नांचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. या गावात एकही शौचालय नसल्‍यामुळे मुली दिल्‍या जात नसल्‍याचे सांगितले जाते. देशाला स्‍वतंत्र मिळून 65 वर्षे पूर्ण झाल्‍यानंतरही या गावात एकही शौचालय नसल्‍याचे बालले जाते. मागच्‍या पिढ्यांनी शौचालय बांधले नाहीत. मात्र आजच्‍या पिढीतील लोकांनीही शौचालयाकडे दुर्लक्ष केल्‍यामुळे या गावतील अनेक मुलीही गाव सोडून जाण्‍याच्‍या विचारात असल्‍याचे सांगितले जाते. शौचालय नसल्‍यामुळे या गावातील मुलांच्‍या लग्‍नाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
पुढील स्‍लाईडवर वाचा का होत नाहीत या गावातील मुलांचे लग्‍न...