आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणी भररस्त्यात अशा भांडल्या, केली मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ- आतापर्यंत तुम्ही एखाद्या मुलीसाठी मुलांमध्ये भांडणे झाल्याचे बघितले असेल. पण येथील नईबस्ती परिसरात जरा विचित्र प्रकार घडला. एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणी भररस्त्यात भांडल्या. त्यांनी एकमेकींना जोरदार मारहाण केली. त्यानंतर तेथे लोक जमले. त्यांनी दोघींना समजवायचा प्रयत्न केला. पण दोघी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यातील एका तरुणीने उपस्थित लोकांना धमकावलेही. त्यानंतर दोघी हातात हात टाकून काही झाले नाही अशा निघून गेल्या.
यातील एक युवती माधवपुरम सेक्टर-दोनमधील एका मोबाईल शॉपवर काम करते. तिचे एका युवकावर प्रेम आहे. परंतु, त्याचे दुसऱ्या एका मुलीवर प्रेम आहे. याची माहिती मोबाईल शॉपवर काम करणाऱ्या युवतीला नव्हती. काही दिवसांपूर्वी तिने दोघांना बाईकवर फिरताना बघितले. तेव्हापासून ती युवकाच्या गर्लफ्रेंडच्या मागावर होती.
मुलींमधील भांडणाने लोक जमले
दोन मुली एकमेकींना जोरदार मारहाण करीत असल्याचे बघून लोक जमा झाले. त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. यातील मारहाण करणारी तरुणी दारु माफियाची बहिण आहे. मारहाण करताना तिने दुसऱ्या तरुणीला भावाचे नाव सांगून धमकावले. मध्यस्थी करणाऱ्या लोकांनाही भावाचे नाव सांगून दूर राहण्यास सांगितले. पुन्हा त्याच्यासोबत दिसली तर परिणाम गंभीर होती, असेही खडसावले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, दोन तरुणींमधील मारहाणीचे फोटो....