आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UP IG Registered A Police Complaint Against Mulayam Singh

मुलायमसिंह यांची जिवे मारण्याची धमकी, UP पोलिस महानिरिक्षकांचाच आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- उत्तर प्रदेशचे पोलिस महानिरिक्षक (सिव्हिल डिफेन्स) अमिताभ ठाकूर यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांच्यावर जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. लखनौतील हजरतगंज पोलिस ठाण्यात जाऊन ठाकूर यांनी ही तक्रार दिली. पोलिस ठाण्याचे इन्चार्ज विजयमलसिंह यादव यांनी मीडियाच्या दबावाखाली ठाकूर यांचा अर्ज स्वीकारला. परंतु, पोलिस तक्रार दाखल नाही केली, असे ठाकूर यांनी सांगितले. एखाद्या राज्याच्या पोलिस महानिरिक्षकाने सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखाविरुध्द तक्रार देण्याची ही पहिलीच घटना आहे.
अखिलेश यांनी वडीलांवर कारवाई करावी
अमिताभ ठाकूर यांनी सांगितले, की मला आणि माझ्या पत्नीला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आमच्या जिवाला धोका आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी कर्तव्याचे पालन करावे. मुलायमसिंह यांच्याविरुद्ध कारवाई करावी.
पत्नीने जाहीर केला चर्चेचा ऑडियो
अमिताभ ठाकूर यांची पत्नी नूतन यांनी मुलायमसिंह आणि अमिताभ यांच्या काल (शुक्रवार) झालेल्या चर्चेचा ऑडिओ जाहीर केला. यात मुलायमसिंह यादल ठाकूर यांना धमकावताना दिसतात.
अमिताभ यांनी सांगितले, की माझ्या मोबाईलवर शुक्रवारी सायंकाळी चार वाजून 43 मिनिटांनी 0522-2235477 या क्रमांकावरुन फोन आला. मला सांगण्यात आले, की मुलायमसिंह यादव यांना माझ्याशी बोलायचे आहे. त्यानंतर आमच्यात सुमारे दहा मिनिटे चर्चा झाली. त्यांनी मला यावेळी धमकावले.
पत्नीने खाण मंत्र्याविरुद्ध दाखल केली होती पोलिस तक्रार
नूतन यांनी खाणमंत्री गायत्री प्रसाद प्रजापती, उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्ष जरीना उस्मानी, आयोगाचे सदस्य अशोक पांडेय यांच्याविरुद्ध गोमतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लोकायुक्तासमोर अमिताभ यांनी प्रजापती यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यामुळे प्रजापती, उस्मानी आणि पांडेय त्यांना रेपच्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप यात करण्यात आला आहे.
राजकीय पक्षांनी केली टीका
भाजपचे प्रवक्ते डॉ. आय. पी. सिंह यांनी सांगितले, की समाजवादी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांचा हा धंदाच आहे. ते नेहमीच लोकांना धमकावत असतात. भाजपचे खासदार महंद आदित्यनाथ म्हणाले, की वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखावर आरोप केले आहेत. याचे गांभिर्य यावरुन दिसून येते. राज्यात अराजकता पसरली आहे. कॉंग्रेस प्रवक्ते बिजेंद्र त्रिपाठी म्हणाले, की मुलायमसिंह यांना असे धमकावणे शोभत नाही. यावरुन सिद्ध झाले आहे, की समाजवादी पक्षाचे सरकार गुन्हेगारी स्वरुपाचे आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, अमिताभ ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीची कॉपी.... मुलायमसिंह आणि अमिताभ यांच्यातील संवाद वाचा... जसाचा तसा....