आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वासराची कत्‍तल झाल्याने युपीत उसळली धार्मिक दंगल; महोबा येथे जाळपोळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहोबा येथे दुकानांना लावलेली आग - Divya Marathi
मोहोबा येथे दुकानांना लावलेली आग

झांसी - उत्‍तर प्रदेशमध्‍ये धार्मिक दंगल थांबता थांबेनात. त्‍यामुळे परिस्थिती तणावपूर्ण असून, काल (शनिवारी) महोबा येथे वासराची कत्‍तल झाल्‍याने हिंदू संघटनांच्‍या भावनेचा उद्रेक झाला. यातून मुस्‍लीम वस्‍तीतील दुकानांची जाळपोळ करण्‍यात आली; तर देवबंद (जि. सहारनपूर) येथे वाल्मीकि समाजाच्‍या वस्‍तीमध्‍ये एकाला मारहाण करण्‍यात आली. त्‍यामुळे तिथेहीही तणाव आहे. शिवाय, सोशाल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्‍यामुळे मुरादाबामध्‍ये परिस्थिती चिघळली आहे.

काय झाले महोबामध्‍ये
महोबाच्‍या कुलपहाड परिसरात काल (शनिवार) एका वासराचीकत्‍तल करण्‍यात आली. त्‍यामुळे संतप्‍त झालेल्‍या हिंदूत्‍ववादी संघटनांनी बाजारपेठ बंद करण्‍याचा प्रयत्‍न केला. यात काही भाजपचे कार्यकर्तेसुद्धा सहभागी होते. दरम्‍यान, याला व्‍यापा-यांकडून विरोध झाला. त्‍यामुळे संतप्‍त जमावाने 10 दुकानांना आग लावली. ही सर्व दुकाने मुस्‍लीम समाजातील व्‍यापा-यांची होती. हा प्रकार शासकीय अधिकारी आ‍णि पोलिस कर्मचा-यांसमोर घडला हे विशेष. मात्र, जमावाचे रोद्ररुप पाहता ते काहीही करू शकले नाहीत. त्‍यानंतर राखीव सुरक्षा दलाला पाचारण करण्‍यात आले असून, कडक बंदोबस्‍त आहे.

या कारणाने झाला सहारनपूरमध्‍ये तणाव
सहारनपूर जिल्‍ह़यातील देवबंद येथील वाल्मीकि समाजाच्‍या वस्‍तीमध्‍ये शनिवारी काही मुस्‍लीम युवकांनी एका सफाई कर्मचा-याला मारहाण केली. त्‍यानंतर या परिसरात तणाव निर्माण झाला. काही नागरिकांनी जिटी रोडवर जाम लावला. त्‍यामुळे सहारनपूर-मुजफ्फरनगर महामार्गावरील वाहतूक खोळबंली होती. या परिसरातही कडक पोलिस बंदोबस्‍त लावण्‍यात आला आहे.

दंगलीच्‍या प्रमुख घटना अशा
>3 जुलैला सहारनपूरमध्‍ये क्षुल्‍लक कारणावरून दलित-मुस्लिम यांच्‍यात तणाव निर्माण झाला. दोन्‍ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक करण्‍यात आली.
>3 जुलैला मेरठच्‍या बागपतमध्‍ये पाच रुपयावरून युवकाचा खून झाला. त्‍यानंतर दोन भीन्‍न समाजात जणाव निर्माण झाला.
> 3 जुलैला मेरठच्‍या मीरापूर भागात लाउडस्पीकर वाजवण्‍याच्‍या कारणावरून दोन गटांत णाव झाला.
>2 जुलैला बिजनौरमध्‍ये लाउडस्पीकर वाजवण्‍यावरूनच तणाव झाला.
>1 जुलैला मुजफ्फरनगरमध्‍ये हिंदू युवकाच्‍या हत्‍येनंतर स्जिदवर हल्‍ला झाला.
>30 जूनला मुजफ्फरनगरमध्‍ये मस्जिद स्‍फोट झाला.
>30 जूनला शामलीमध्‍ये वासराची चोरी केल्‍याच्‍या आरोपावरून बजरंग दलाच्‍या कार्यकर्त्‍यांनी एका मुस्लिम युवकाला मारहाण केली.
>29 जूनला मुजफ्फरनगरमधील मीरापुरातील मस्जिदीच्‍या समोर एका युवकाची गोळी मारून हत्‍या झाली. त्‍यानंतर पोलिसांवर तुफान दगडफेक करण्‍यात आली.
>28 जूनला सहारनपूरमध्‍ये मुलीची छेड काढण्‍यावरून दोन समाजात वाद; नंतर युवकाची हत्‍या.
>27 जूनला रामपूरमध्‍ये मुलीच्‍या छेडछाड प्रकरणानंतरच दोन गटांकडून एकमेकांवर दगडफेक