आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UP LUCK Criminal Salman Arrested In Bareilly Accepted dozens Of Killing

युवकाने केले तब्‍बल 57 खुन; म्‍हणतो, खुनाशिवाय दरोडा टाकण्‍यात मज्‍जाच नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
57 निष्‍पाप व्‍यक्‍तींचा खून करणारा हाच तो युवक. - Divya Marathi
57 निष्‍पाप व्‍यक्‍तींचा खून करणारा हाच तो युवक.

बरेली (यूपी) - त्‍यांचे वय वर्ष अवघे 25. नाव सलमान. एका अट्टल दरोडेखोरांच्‍या टोळीचा तो मोरक्‍या आहे. त्‍याने वयाच्‍या 25 व्‍या वर्षीच एक-दोन नव्‍हे तर तब्‍बल 57 निष्‍पाप व्‍यक्तिंच्या हत्या केल्या आहेत. तेही अगदी शांत डोक्‍याने. यातील अनेकांना तर तो ओळखतही नव्‍हता. त्‍याच्‍या टोळीने अनेक दरोडेही टाकलेत. दरोडा टाकताना खून केल्‍याशिवाय दरोड्याची मज्‍जाच येत नाही, असे क्रुरक्रर्मा सलमानने पोलिसांना सांगितले.

एका दरोड्याच्‍या आणि खुनाच्‍या प्रकरणात शुक्रवारी पोलिसांनी त्‍याला अटक केली. पोलिसी खाक्‍या दाखवताच त्‍याने आपल्‍या गुन्‍ह्याची कबुली तर दिलीच; पण या खुनासह आतापर्यंत आपण 57 खून केल्‍याचेही सांगितले. दरोडा टाकायला गेल्‍यानंतर खुन केल्‍याशिवाय दरोड़याचे समाधानच मिळत नसल्‍याचे सांगताना त्‍याची चीभ अडखळली नाही. त्‍यामुळे पोलिसही स्‍तंभित झाले.

पोलिस खब-याचाही खून करणार
खब-याकडून मिळालेल्‍या गुप्‍त माहितीच्‍या आधारे बरेली पोलिसांनी सलमान आणि त्‍याच्‍या तीन सहका-यांना अटक केली. ज्‍याने कोणी पोलिसांना आपल्‍या विषयी माहिती दिली त्‍यालाही तुरुंगातून बाहेर आल्‍यानंतर ठार मारू, अशी धमकीही देण्‍यास सलमान याने मागे पुढे पाहिले नाही.