मऊ (उत्तर प्रदेश)- एकिकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव पोलिस विभागाचे तोंड भरुन कौतुक करीत आहेत तर दुसरीकडे पोलिस हवालदार दारु घेऊन भररस्त्यात गोंधळ घालत आहेत. व्हिडिओत दिसत असलेल्या पोलिस हवालदाराने प्रचंड दारु घेतली आहे. त्याला धड चालताही येत नाही. मध्येच खाली रस्त्यावर कोसळतो. लोकांमध्ये अश्लिल हावभाव करतो. जणू काही तो उत्तर प्रदेशातील वानराची नक्कल करतोय.
या घटनेची माहिती मिळाल्यावर इतर पोलिस येथे दाखल होतात. त्याला गाडीत बसवून घेऊन जातात. पण गणवेशात असताना दारु घेणे आणि त्यानंतर असा लोकांसमोर गोंधळ घालणे पोलिसांना शोभते का? अशाने लोकांमध्ये असलेली पोलिसांची प्रतिमा खराब झाल्याशिवाय राहणार नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा या घटनेचे फोटो....