आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्यांच्या रक्तरंजित गोरखपूर ट्रॅजेडीतील तीसरा नराधम डॉ. कफील खान याला अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर (उत्तर प्रदेश)- येथील बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या चिमुकल्यांच्या मृत्यूप्रकरणी उत्तर प्रदेशच्या एसटीएफने डॉ. कफील खान याला गोरखपूर येथून अटक केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कफील खान पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्वरीत कारवाई करुन त्याला अटक करण्यात आली. डॉ. कफील खान आणि डॉ. सतीश यांच्यासह सात आरोपींविरुद्ध काल गैरजमानती अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात गोरखपूर येथील बाबा राघव दास मेडिकल हॉस्पिटलमध्ये 30 चिमुकल्यांसह 60 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर यावरुन प्रचंड गोंधळ उडाली होता.
 
पोलिस तपासात सहकार्य केले नाही
- उत्तर प्रदेश एसटीएफचे आयजी अमिताभ यश यांनी सांगितले, की गोरखपूर येथून डॉ. कफील खान यांना अटक करण्यात आली आहे. बीआरडीमध्ये झालेल्या चिमुकल्यांच्या मृत्यूप्रकरणापूर्वी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रकरण सुरु होते. पोलिस तपासात ते सहकार्य करत नव्हते. त्यामुळे एटीएफने त्यांना अटक केली. पुढील कारवाईसाठी एसटीएफने पोलिसांना हे प्रकरण सोपवले आहे.
 
डॉ. कफिल आपल्या क्लिनिकमध्ये सरकारी ऑक्सिजन सिलिंडर वापरत होते
गाेरखपूरमध्ये लहान मुलांचा चांगला दवाखाना शोधायला जाल तेव्हा तुम्हाला कुणीही मेडी स्प्रिंगचे नाव सांगेल. त्याचे संचालक डॉ. कफिल खान आहेत. मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्याच्या कामात ज्यांचे कौतुक झाले तेच हे कफिल. रुस्तमपूरमधील स्वत:च्या याच रुग्णालयातून ते रात्री सिलिंडर घेऊन गेले होते. बाहेर डॉ. के. खान यांच्या नावाची पाटी होती. वृत्तपत्रांतील बातम्यांचा फ्लेक्सही लावला होता.
 
नोकरीत असताना डॉ. कफिल स्वत:चे रुग्णालय कसे चालवत होते, असे विचारल्यावर कर्मचाऱ्यांचा सूरच बदलला. डॉ. कफिल येथून सिलिंडर का घेऊन गेले? हे सिलिंडर मेडिकल कॉलेजची होती का? या प्रश्नांवर ते गप्प बसले. म्हणाले, हे रुग्णालय कफिल यांच्या पत्नी शबिस्ता आझम खान चालवतात. त्यांचे केवळ नाव दिले आहे. मात्र, मुलगा नेहा मधूला दाखवण्यासाठी आलेल्या नातेवाइकाने वस्तुस्थिती सांगितली. शबिस्ता तर डेंटिस्ट आणि आझम बीयूएमएस डॉक्टर असल्याचे ते म्हणाले. काही वेळानंतर कफिल यंाचे रुग्णालयाबाहेरचे नाव पुसण्यात आले. कफिल यांची भेट होऊ शकली नाही.
 
राजीव मिश्रा आणि पौर्णिमा यांना अटक
- 30 ऑगस्टला बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी माजी अधिष्ठाता डॉ. राजीव मिश्र आणि त्यांची पत्नी पौर्णिमा शुक्ला यांना ड्रान्झिट रिमांडवर कानपूर येथून गोरखपूरला आणण्यात आले होते. एसीबी कोर्टाने दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावली आहे.
- 29 ऑगस्ट रोजी एसटीएफने डॉ. राजीव मिश्र आणि डॉ. पौर्णिमा शुक्ला यांना कानपूर येथून अटक केली होती.
 
काय आहे गोरखपूर ट्रॅजडी
- बाबा राघव दास (बीआरडी) मेडिकल कॉलेजमध्ये 7 ते 12 ऑगस्ट दरम्यान 30 लहान मुलांसह 60 रुग्णांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन पुरवठा बंद पडल्यामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप होत आहे.
- पुष्पा सेल्स कंपनीचे 86 लाख रुपये बिल थकल्यामुळे त्यांनी ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला होता.
- कंपनीचे म्हणणे होते की आम्ही 14 स्मरण पत्र पाठवले मात्र त्यानंतरही प्राचार्य राजीव मिश्रा यांनी दखल दिली नाही.
- 30 बालकांसह 60 जणांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरातून या घटनेबद्दल रोष व्यक्त होऊ लागला होता. त्यानंतर योगी सरकारने तडकाफडकी प्राचार्य मिश्रा यांना निलंबित केले.
 
सीएम योगी काय म्हणाले होते
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते, \'रुग्ण इन्सेफेलायटिसमुळे दगावले आहेत. गलिच्छ वातावरणामुळे हा आजार होतो. जे झाले ते चुकीचेच आहे. त्याची चौकशी सुरु आहे. दोषींना सोडले जाणार नाही. का आणि कसे झाले याला आता काही अर्थ नाही. कारवाई होणार आणि निश्चित होणार. जेणे करुन अशा घटना भविष्यात परत घडल्या नाही पाहिजे.\'
 
घटनेने पंतप्रधानांना दुःख - अनुप्रिया पटेल
- केंद्र सरकारने केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पेटल यांना पाहणीसाठी पाठवले होते.
- अनुप्रिया पटेल म्हणाल्या, \'या घटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दुःख झाले आहे. मी तातडीने गोरखपूरला जात आहे.\'
- केंद्राने उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री आशुतोष टंडन यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.
 
प्रश्नोत्तरातून समजून घ्या योगींच्या राज्यातील मृत्यूचे तांडव
9 ऑगस्ट रोजी योगींनी मेडिकल कॉलेजची पाहाणी केली होती, मात्र ऑक्सिजन पुरवठा बंद असल्याची त्यांना कल्पना नव्हती. दुसरीकडे यूपी सरकारने 26 बालकांसह 63 रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन पुरवठा बंद पडल्यामुळे झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. सरकारने म्हटले आहे, की ऑक्सिजनमुळे मृत्यू झालेले नाही.
- जिल्हाधिकारी राजीव रौतेला यांनी या घटनेचे न्यायिक चौकशीचे आदेश दिले आहे. ते म्हणाले, शुक्रवारी 7 जणांचा मृत्यू आजारपणामुळे झाला.
- बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये दोन वर्षांपूर्वी द्रवरुप ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यात आला होता. येथून 100 खाटांच्या इन्सेफेलायटिस वॉर्डसह 300 रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जातो.
 
Q. किती मुले दगावली?
A- 1969 मध्ये तयार झालेल्या बीआरडी मेडिकल कॉलेज आणि सरकारी हॉस्पिटलमधील बाल रोग विभागात गेल्या 36 ते 48 तासांत 26 मुलांचा मृत्यू झाला आहे.
 
Q. मुलांच्या मृत्यूचे कारण काय?
A - 7 मुलांचा मृत्यू इन्सेफेलायटिसमुळे झाला. याला मेंदूपर्यंत ताप पोहोचणेही म्हटले जाते. हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे. गोरखपूर आणि आसपासच्या परिसरात हा आजार बऱ्याच वर्षांपासून पाहायला मिळतो. लहान मुले याला लवकर बळी पडतात. खूप ताप, वेदना आणि शरीरावच चट्टे येतात. प्रशासनाचा दावा आहे की 25 मुलांचा मृत्यू वेगळ्या कारणाने झाला आहे.
 
Q. ऑक्सिजन पुरवठा बंद होण्याचे काय प्रकरण?
A- सरकारचा दावा आहे की मुलांसह 63 रुग्णांच्या मृत्यूचे कारण ऑक्सिजन पुरवठा बंद होणे नाही, मात्र मेडिकल कॉलेजमध्ये गुरुवारपासून ऑक्सिजन पुरवठा बंद झाला होता. त्यासाठीची कोणतीही पर्यायी व्यवस्था नव्हती. त्यामुळे गोंधळ उडाला.
- गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजता 52 सिलिंडरद्वारे पुरवठा सुरु करण्यात आला. ही खेप रात्री 1 वाजता संपली. रात्री 1.30 वाजता फैजाबाद येथून 50 सिलिंडर मागवण्यात आले.
- शुक्रवारी सकाळी पुन्हा तारांबळ उडाली. दुपारी 1.30 वाजता गोरखपूर येथील मोदी फार्मा येथून 22 सिलिंडर मागवण्यात आले. 4.30 वाजता 36 सिलिंडर पोहोचले. शुक्रवारी सकाळी रुग्णवाहिकेच्या मदतीने ऑक्सिजन दिले जात होते.
- गोरखपूर औद्योगिक विकास प्राधिकरण (गीडा), सशस्त्र सीमा दल आणि खासगी हॉस्पिटल्सची मदत घेण्यात आली.
- हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये मृत्यूची कारणे देण्यात आली आहेत.
 
Q. यूपी सरकार काय करत आहे?
A- यूपी सरकारने सुरुवातीला दावा केला की एकही मृत्यू ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने झालेला नाही. गोरखपूरचे जिल्हाधिकारी म्हणाले, डॉक्टरांचे म्हणणे आहे की ऑक्सिजन नसल्यामुळे मृत्यू झालेला नाही, कारण त्यांच्याकडे पर्यायी व्यवस्था होती.
 
Q. ऑक्सिजन पुरवठा करणारी कंपनी काय म्हणते?
A- बीआरडी हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरवठा करणारी गुजरातची पुष्पा सेल्स कंपनी आहे. याचे यूपी डीलर मनीष भंडारी यांनी DivyaMarathi.com ला सांगितले, \'मेडिकल कॉलेजकडे 69 लाख रुपयांचे बिल थकले आहे. आज (शुक्रवार) 22 लाख रुपये मिळाले आहे. उद्या (शनिवार) 40 लाख रुपये मिळणार आहेत. राजस्थानहून एक ट्रक द्रवरुप ऑक्सिजन पाठवण्यात आले आहे. ते आज रात्री (शुक्रवारी रात्री) हॉस्पिटलमध्ये पोहोचेल. या प्रकरणात हॉस्पिटलचे अधिष्ठाता राजीव मिश्रा दोषी आहे, त्यांनी पेमेंट रोखून धरले होते.\'
- पुष्पा सेल्स कंपनीने सांगितले की गेल्या 6 महिन्यांपासून बिल थकले होते. पेमेंटसाठी गेल्यानंतर दिवसदिवसभर उभे राहावे लागत होते, तरीही अधिष्ठाता मिश्रा भेटत नव्हते. तीन वर्षांपूर्वी ऑक्सिजन पुरवठा करण्याचे कंत्राट मिळाले होते. कधीही बिल थकले नाही, मात्र गेल्या 6 महिन्यापासून पेमेंटच केला जात नव्हता.
 
पुढील स्लाईडवर वाचा, अशी आहे गोरखपूरमधील बीआरडी मेडिकल कॉलेजची अवस्था....
बातम्या आणखी आहेत...