आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलायमसिंहच घेतील महायुतीचा निर्णय, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाची इतरांशी महायुती होणार की नाही, वा ती कशी असेल आदी सर्व निर्णय घेण्याचे व घोषणेचे अधिकार नेताजी मुलायमसिंह यांनाच असून यासंबंधीची अधिकृत घोषणा करणे वा त्यासंबंधी काय तो निर्णय तेच घेतील, असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोमवारी केले. यासंबंधी काही सूचना वा सल्ला द्यायचा असल्यास आपण तो पक्षाच्या पातळीवर व पक्षाच्या व्यासपीठावरूनच देणे पसंत करू, असेही ते सूचकपणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
महायुतीसंबंधीची पहिली बैठक नुकतीच मुलायमसिंह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाली आहे. मुलायम यांनीही बिहारप्रमाणेच महागठबंधनची शक्यता व्यक्त केलेली आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. या महायुतीच्या निर्णयाचा कुणाला फायदा होईल व कुणाला तोटा होईल. याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षच घेतील. पत्रकारांनी प्रश्न विचारला की, सपा आणि काँग्रेसची हातमिळवणी झाली आहे काय? त्यावर अखिलेश म्हणाले, समजा त्यांना सपा आणि काँग्रेसला युती हवीच असेल तर तुम्ही (मीडिया) ती थांबवू शकणार आहात काय? इकडे महागठबंधनाच्या तयारीचा भाग म्हणून मुलायमसिंह यादव यांना अनेक नेते भेटत आहेत. प्रशांत किशोर यांनी तर सहा दिवसांत दुसऱ्यांदा नेताजींची भेट घेतली आहे. त्यांची पहिली बैठक दिल्ली निवासस्थानी १ नोव्हेंबर रोजी झाली होती.
खिचडी शिजल्यावर सांगेन : शिवपाल
याविषयी सपाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव म्हणाले की, जेव्हा ही महायुती तयार होण्याच्या मार्गावर असेल, म्हणजेच खिचडी पकेल तेव्हाच मी तुम्हाला नक्की सांगेनच.

अखिलेश-किशोर यांची बंदद्वार चर्चा
मुलायमसिंह यादव यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसची निवडणूक रणनीती ठरवणारे प्रशांत किशोर यांनी सोमवारी अखिलेश यादव यांच्याशी सोमवारी बंदद्वार चर्चा केली. त्यामुळे दोन्ही पक्षांत युती होण्याची शक्यता बळावली आहे. महायुती झाल्यास तिकीट वाटप तसेच मतदारसंघांची निवड या मुद्द्यांवर अखिलेश यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...