लखनऊ -उत्तर प्रदेशमधील सरकारी अधिकाऱ्यांना आता दुपारी कामावरून गायब राहणे किंवा एखाद्या जुन्या मित्रास भेटण्यास निघून जाणे कठीण होणार आहे. कारण अधिकारी जागेवर आहेत की नाहीत हे लँडलाइनवर फोन करून तपासण्याचा निर्णय मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी घेतला आहे. ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा यांनी सांगितले की, आदित्यनाथ सकाळी ९ ते सायंकाळी ६ दरम्यान विविध कार्यालयांना लँडलाइन फोनवर सरप्राइज फोन लावतील. अधिकारी अनुपस्थित असल्याचे काही कारण सांगू शकला नाही तर त्याला दंड लावला जाईल. मात्र, फिल्ड जॉब अशलेल्या अधिकाऱ्यांना यातून सूट देण्यात आली आहे. यामागे कल्पना अशी आहे की, मोठा अधिकारी कार्यालयात असला तर कनिष्ठदेखील त्याचे उदाहरण समोर ठेवेल. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना घरातच त्यांनी उघडलेली कार्यालये बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कार्यालयात बायोमॅट्रिक्स हजेरी यंत्रणा असेल सरकारने १५ सरकारी सुट्याही रद्द केल्या आहेत. सरकारला १०० दिवस होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या आदेशांचे पालन होत आहे की नाही याची चौकशीही मुख्यमंत्री करतील.