आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मोदी-आबेंच्या स्वागतासाठी नववधूसारखा सजवलाय काशीचा घाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी (उत्तर प्रदेश)- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या स्वागतासाठी दशाश्वमेध घाट अगदी नववधूसारखा सजवण्यात आला आहे. येथून दोघे नेत्रदिपक गंगा आरती बघणार आहेत. हा घाट सर्वसामान्यांसाठी आता बंद करण्यात आला आहे. दोघांच्या आगमानानिमित्त वाराणसी विमानतळ, ताज हॉटेल आणि दशाश्वमेध घाट ताजी फुले, मंडप आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या घाटावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आता त्यांच्या जोडीला कमांडो, स्नायपर, लष्कराची तुकडी आणि सुरक्षा इतर पथके दाखल झाली आहेत.
असा बंद केला आहे दशाश्वमेध घाट
मोदी आणि आबे यांच्या आगमनाच्या 24 तासांपूर्वीच दशाश्वमेध घाट बंद करण्यात आला आहे. येथूनच गंगेची आरती केली जाते. या घाटाच्या डावीकडे मीर घाट आणि उजवीकडे शीतला घाट आहे. त्यांनाही फुलांनी आणि मंडपाने सजवण्यात आले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, वाराणसीतील दशाश्वमेध घाटाचे फोटो.....
बातम्या आणखी आहेत...