आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wife Murdered Husband And Son Over Extramarital Relations With FB Friend

FB फ्रेंडसोबत प्रस्थापित केले संबंध, नंतर डॉक्टर पती, चिमुकल्या मुलाची हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर (उत्तर प्रदेश)- डॉक्टर पती आणि पाच वर्षांच्या चिमुकल्याची हत्या पत्नीनेच केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. फेसबुक फ्रेंडच्या मदतीने पत्नीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा करण्यापूर्वी दोघांनी सेक्स केल्याचीही माहिती आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
गोरखपूर पोलिस आयुक्त लव्हकुमार यांनी सांगितले, की पतीचे नाव डॉ. ओमप्रकाश यादव, आरोपी पत्नीचे अर्चना यादव तर मुलाचे नितिन आहे. तिची सुमारे आठ महिन्यांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून अजय यादवसोबत ओळख झाली होती. तो शिकोहाबाद येथील रहिवासी आहे. त्यानंतर दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. प्रेमाचे रुपांतर शारीरिक संबंधांमध्ये झाले. दोघांच्या गाठी भेटी वाढू लागल्या.
डॉक्टर पती नसताना घरी यायचा बॉयफ्रेंड, अशी केली हत्या
- 2009 मध्ये ओमप्रकाश यांचे अर्चनासोबत लग्न झाले. हे त्यांचे दुसरे लग्न होते. दोघांमधील वैवाहिक संबंध ताणतणावाचे होते. त्यामुळे घरी डॉक्टर नसताना अजय घरी येत असे. 20 जानेवारीच्या रात्री अजय आणि अर्चना यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हा डॉक्टर मुलासह शेजारी असलेल्या एका पार्टीत गेले होते. त्यानंतर दोघे घरी येऊन झोपून गेले. रात्री सुमारे एकच्या सुमारास डोक्यावर हातोडीने प्रहार करुन डॉक्टरचा खून करण्यात आला. आवाज ऐकून नितिन जागा झाला. अजयने त्याची गळा आवळून हत्या केली.
सुरवातीला राजकीय वैमनस्य वाटली होती हत्या
ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली असावी असा सुरवातीला पोलिसांचा संशय होता. घरातील सामान अस्थाव्यस्त पडले होते. गुरुवारी सकाळी घरी काम करण्यासाठी घरगडी आले तेव्हा ओमप्रकाश आणि नितिनची हत्या झाल्याचे उघडकीस आले. अर्चना असलेली खोली बाहेरुन बंद होती. ओमप्रकाश राजकारणात सक्रीय होते. यातूनच त्यांची हत्या झाली असावी असे पोलिसांना वाटले होते.
पुढील स्लाईडवर वाचा, अर्चनाने पोलिसांची कशी केली दिशाभूल....