आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman IAS Officer Levels Allegation Against District Collector

कलेक्टर रात्री 2 वाजता महिला IAS ला घरी बोलवायचे, स्वयंपाक करायला लावायचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्याचे कलेक्टर रंजन कुमार यांच्यावर ज्युनिअर महिला आयपीएस अधिकाऱ्याने गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. रात्री 2 च्या सुमारास रंजन कुमार घरी फाइल बघायला बोलवायचे. त्यानंतर स्वयंपाक करायला लावायचे, असा आरोप या महिला अधिकाऱ्याने केला आहे. तुमचा चेहरा कामय माझ्यासमोर राहावा यासाठी शहरात नियुक्ती केली आहे, असे कलेक्टर मला म्हणायचे असेही या महिला अधिकाऱ्याने सांगितले आहे. रंजन कुमार या महिला आयपीएसला काही वेळा चित्रपट बघायलाही घेऊन गेले होते.
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते नुतन ठाकूर यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे तक्रार केली आहे. नुतन यांनी सांगितले आहे, की माझे पती आयजी अमिताभ ठाकूर आणि महिला अधिकारी एकमेकांना आधीपासून ओळखतात. मला आणि माझ्या पतीला या महिला अधिकाऱ्याने आधीच आपबिती सांगितली आहे. या संपूर्ण प्रकरणाची गुप्तपणे चौकशी व्हायला हवी. आरोप सिद्ध झाल्यास कलेक्टरविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी अमिताभ ठाकूर यांनी केली आहे.
प्रमुख सचिवांना पतीसोबत जाऊन भेटली महिला अधिकारी
महिला आयपीएस अधिकारी काल पतीसोबत मुख्य सचिवांना भेटली. यावेळी बंदद्वार चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्याची काही माहिती देण्यास महिला अधिकाऱ्याने नकार दिला.
महिला अधिकाऱ्याने सिनिअर आयएएसकडेही केली तक्रार
महिला अधिकाऱ्याने एका सिनिअर आयएएस अधिकाऱ्याकडेही तक्रार केली आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले, की कलेक्टरचे वागणे बरोबर नाही. महिला अधिकारी मला मुलीसारखी आहे. मला वाटते, की हे प्रकरण येथेच थांबायला हवे. आणखी वाद व्हायला नको.
कलेक्टर म्हणाले, प्रकरणाला उगाच महत्त्व दिले जात आहे
माझ्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचा दावा करीत गोरखपूरचे कलेक्टर रंजन कुमार म्हणाले, की याला उगाच महत्त्व दिले जात आहे. मीडियाला खासगी प्रकरणी एवढा रस का आहे, हे मला समजत नाही. आजही मला अनेक फोन येत आहेत. महिला अधिकारी प्रमुख सचिवांकडे बदलीबाबत माहिती घेण्यासाठी गेल्या होत्या. माझी तक्रार करण्यासाठी गेल्या होत्या, असा चुकीचा प्रचार केला जात आहे. छेडाछाड झाल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, ऑफिसमध्ये बोलावून कलेक्टरने केले होते इजहार-ए-इश्क