आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Young Girl Commits Suicide In Police Station, One You Killed In Firing

UP: पोलिस ठाण्यात तरुणीने घेतली फाशी, पोलिस फायरिंगमध्ये एकाचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीतापूर (उत्तर प्रदेश)- महमुदाबाद पोलिस ठाण्याच्या टॉयलेटमध्ये एका तरुणीने फाशी लावून आत्महत्या केली. तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर रेप आणि मर्डरचा आरोप केला आहे. परंतु, पोलिसांनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सांगितले आहे. मृतदेह मिळाल्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तोडफोड केली आणि वाहनांना आग लावली. त्यानंतर पोलिस ठाण्याच्या बाहेर मोठी गर्दी जमली. त्यांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरवात केली. यात आयुक्त, उपायुक्त जखमी झाले. जमवाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.
असे आहे प्रकरण
आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव जीनत आहे. ती 19 वर्षांची आहे. भावासोबत तिचे भांडण झाले होते. त्यानंतर ती घर सोडून निघून गेली. वनविभागाच्या गार्डला ती एका कॅनलजवळ बसलेली दिसली. ती आत्महत्या करण्याच्या विचारात होती. गार्डने तिचे मनपरिवर्तन केले. तिला पोलिस ठाण्यात आणले. तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एका कॉन्स्टेबलची ड्युटी लावण्यात आली होती. या दरम्यान ती टॉयलेटला गेली. बराच वेळा झाला तरी बाहेर आली नाही. कॉन्स्टेबलने बऱ्याच वेळा दार ठोठावले. आवाज दिला. पण काही उत्तर मिळाले नाही. त्याने वरिष्ठांना याची माहिती दिली. त्यानंतर टॉयलेटचे दार तोडण्यात आले. तेव्हा तिने गळफास घेतला असल्याचे दिसून आले. दुपट्याच्या मदतीने तीने गळफास घेतला होता.
काय म्हणतात पोलिस
लखनौ रेंजचे आयजी जकी अहमद यांनी सांगितले, की हे गंभीर प्रकरण आहे. याची चौकशी केली जात आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर ठोस माहिती हाती येईल.
पुढील स्लाईडवर बघा, लोकांनी पोलिसांवर अशी केली दगडफेक... पोलिस असे झाले जखमी...